मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन यांचे दौरे रहित !

अहिल्यानगरमध्ये २९ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघा’च्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणारच ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वांनी धैर्य ठेवावे. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे पत्रकारांशी बोलत होते.

पेट्री (जिल्हा सातारा) येथील रिसॉर्टवर अश्लील नृत्याच्या वेळी पोलिसांची धाड

पोलिसांनी केवळ एका रिसॉर्टवर कारवाई करून न थांबता, अन्य ठिकाणी असे होत नाही ना, हे पहावे.

शाळेत हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करावी ! – सकल हिंदु समाजाची नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या सकल हिंदु समाजाचे अभिनंदन !
जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत महापालिका आयुक्तांचा पाठपुरावा घ्यायला हवा !

गोव्याला ‘पेंचाक सिलाट’ या क्रीडा प्रकारात मिळाले दुसरे सुवर्ण

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्याच्या करिना शिरोडकर हिने ‘पेंचाक सिलाट’ या क्रीडा प्रकारात जम्मू-काश्मीरच्या जिया चौधरी हिचा ३०-१५ गुणांच्या फरकाने पराभव करत..

खेडमध्ये २७ सहस्र रुपयांचा गांजा पकडला : संशयित पोलिसांच्या कह्यात

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे १ किलो ८०८ ग्रॅम वजनाचा गांजा खेड पोलिसांनी जप्त करून ५ लाख ४४ सहस्र २१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस ठाणे सद्भावनेचे केंद्र ठरावे ! – पालकमंत्री उदय सामंत

पोलिसांची आदरयुक्त भीती असेल, तर गुन्हे कुठेही घडणार नाहीत. पोलिसांनी समन्वयातून मार्ग काढावा. तक्रार आल्यास तिच्याकडे कुटुंबातील तक्रार म्हणून पोलिसांनी पहावे.

महर्षि वाल्मीकि आणि वाल्मीकि समाज यांचा आदर्श प्रत्येक हिंदूंने आत्मसात करावा !- दिलीप गोखले

हिंदु समाजातील महत्त्वाचा असणारा वाल्मीकि समाज मुसलमानी आक्रमकांच्या क्रूरतेला तोंड दिलेला तत्कालीन राजपूत आणि ब्राह्मण वंशीय आहे. ज्यांनी मुसलमान होण्यास नकार दिला.

Israel Hamas war : हमासविरोधातील युद्ध हा इस्रायलचा दुसरा स्वातंत्र्यलढा असून त्यात आम्हीच विजयी होऊ !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची घोषणा !

क्रीडा स्पर्धेत गोव्याची नवीन विक्रमाच्या दिशेने कूच

गोव्याने झारखंड येथे वर्ष २०११ मध्ये झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण १६ पदके (५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ६ कांस्य पदके) प्राप्त केली होती.