पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो आणि बेलापूर-उरण रेल्वे सेवेचे लोकार्पण होणार !

या कार्यक्रमाला सुमारे १ लाख २० सहस्र महिला आणण्याचे मोठे उद्दिष्ट ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या विभागाकडे सोपवण्यात आले आहे. ‘नमो महिला सशक्तीकरण’ अभियानातून लाखो महिला बचत गटांना नव्या सवलती मिळणार आहेत.

शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या तरुणीची फसवणूक करणार्‍या एजन्सीविरोधात गुन्हा नोंद !

या एजन्सीने याआधीही अशा प्रकारे कुणाची फसवणूक केली होती का ? याची चौकशी व्हायला हवी !

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ११२ न्यायाधिशांच्या नियुक्त्याही रहित !

स्वतः न्यायालयानेच १०० हून अधिक न्यायाधिशांची नियुक्ती रहित केल्याने विधीक्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली.

पुणे येथे विद्यार्थी पोषण आहार योजनेतील तांदळाची खुल्या बाजारात विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद !

पोषण आहारासारख्या धान्यामध्येही गैरप्रकार होणे, हे संतापजनक आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !

पुणे शहरातील बाललैंगिक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ !

यातून गुन्हेगारांना कुठलेही भय राहिले नसून समाजाची नैतिकता खालावल्याचे लक्षात येते.

मुख्याध्यापकांना १० वीच्या न्यून निकालासाठी नोटीस !

मार्च २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळांचा निकाल ८५ टक्क्यांपेक्षा न्यून लागला आहे, अशा ८८ शाळांच्या मुख्याध्यापकांना पालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा नोंद ! 

शेतात मका काढणार्‍या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंगही करण्यात आला होता. या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांची पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ विभागाने) छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. 

प्रत्येकाने साधना करणे अनिवार्यच !

‘व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा गाव, गावापेक्षा राष्ट्र आणि राष्ट्र्रापेक्षा धर्म सर्वश्रेष्ठ आहे; कारण फक्त धर्मच मोक्ष देऊ शकतो, तर इतर सर्व मायेत अडकवतात ! म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले