मुख्याध्यापकांना १० वीच्या न्यून निकालासाठी नोटीस !

मुंबई – मार्च २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळांचा निकाल ८५ टक्क्यांपेक्षा न्यून लागला आहे, अशा ८८ शाळांच्या मुख्याध्यापकांना पालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. ७ दिवसांच्या आत खुलासा न पाठवल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची चेतावणीही देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळांनी प्रयत्न करावेत !