श्री ब्रह्मानंद महाराज यांच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाची आज समाप्‍ती !

श्री ब्रह्मानंद महाराज यांचा १०५ वा पुण्‍यतिथी उत्‍सव ७ ऑक्‍टोबरपासून श्री ब्रह्मानंद महाराज संस्‍थान, श्री क्षेत्र नवबाग, कागवाड (जिल्‍हा बेळगाव) येथे प्रारंभ झाला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या १४, तर रस्‍ते विकास महामंडळाच्‍या १५ टोलनाक्‍यांवर हलक्‍या वाहनांना टोल माफ !

महाराष्‍ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या सर्वच्‍या सर्व म्‍हणजे १४ टोलनाके, तर महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाच्‍या एकूण ५० पैकी १५ टोलनाके यांवर जीप, कार यांसारख्‍या खासगी गाड्या, तसेच एस्.टी.च्‍या गाड्या आणि शाळेच्‍या गाड्या यांना टोल माफ आहे.

जितेंद्र आव्‍हाड आणि निखिल वागळे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे नोंदवा !

या देशात हिंदू बहुसंख्‍य असूनही त्‍यांच्‍या धर्माची तुलना डेंग्‍यूचे डास, मलेरिया, कोरोना, एड्‍स यांच्‍याशी करून तो संपवण्‍याचे चिथावणीखोर वक्‍तव्‍य उदयनिधी स्‍टॅलीनसारखे नेते करत आहेत.

आधुनिक विज्ञानापेक्षा श्रेष्ठ हिंदु धर्मग्रंथ !

हल्ली विज्ञानाने जे शोध लावले, त्यांचा शोध आपल्या ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वीच लावला होता. त्यांचा उल्लेख वेद, उपनिषदे, पुराणे यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये केलेला आहे. या ग्रंथांमध्ये अजूनही अनेक वैज्ञानिक सूत्रे सांगितलेली आहेत, की ज्यांच्यापर्यंत आधुनिक विज्ञानाला पोचता आलेले नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्माला संपवण्‍याविषयी ‘हेट स्‍पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे म्‍हणाले की, सर्वोच्‍च न्‍यायालयाने २८ एप्रिल २०२३ या दिवशी दिलेल्‍या आदेशात स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, जर कुणी ‘हेट स्‍पीच’ करून कोणत्‍याही समाजाच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्‍वतःच नोंद घेऊन प्रथम दर्शनी अहवाल (FIR) प्रविष्‍ट केला पाहिजे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ ऑक्‍टोबर या दिवशी मुंबई दौर्‍यावर असणार आहेत. आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी ते उपस्‍थित रहाणार आहेत.

अल्‍प पाऊस पडल्‍याने पश्‍चिम महाराष्‍ट्रातील १२४ गावांमध्‍ये अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा !

यंदा पडणार्‍या पावसाची टक्‍केवारी न्‍यून झाली. त्‍यामुळे पश्‍चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर जिल्‍हा सोडल्‍यास अन्‍य ४ जिल्‍ह्यांतील १२४ गावे टंचाईग्रस्‍त आहेत, तर १० तालुक्‍यांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची स्‍थिती भीषण आहे.

दलाल आणि अनधिकृतपणे प्रवास करणारे यांच्‍यावर मध्‍य रेल्‍वेची कारवाई !

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही रेल्‍वेतून अनधिकृत प्रवास केला जाणे म्‍हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम होय !

घुसखोर गृहयुद्ध घडवतील ! 

मागील अनेक वर्षांत घुसखोरांच्‍या समस्‍यांमधील वाढ, हे अन्‍वेषण यंत्रणांचे अपयश होय !

४ वर्षांनंतर पसार आरोपींना अटक करून १३ लाख रुपयांचे सोने शासनाधीन !

स्‍थानिक स्‍तरावरील गुन्‍हेगार वर्षानुवर्षे पसार असणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?