श्री ब्रह्मानंद महाराज यांच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाची आज समाप्‍ती !

मिरज, १३ ऑक्‍टोबर (वार्ता.) – श्री ब्रह्मानंद महाराज यांचा १०५ वा पुण्‍यतिथी उत्‍सव ७ ऑक्‍टोबरपासून श्री ब्रह्मानंद महाराज संस्‍थान, श्री क्षेत्र नवबाग, कागवाड (जिल्‍हा बेळगाव) येथे प्रारंभ झाला. उत्‍सवकाळात समाधी मंदिर येथे कु. शंभू पटवर्धन यांच्‍या हस्‍ते पादुकापूजन करण्‍यात आले. या प्रसंगी संस्‍थानचे विश्‍वस्‍त अधिवक्‍ता समीर पटवर्धन आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. सुचित्रा पटवर्धन उपस्‍थित होत्‍या. उत्‍सवकाळात विविध कार्यक्रम पार पडले. १४ ऑक्‍टोबर या दिवशी उत्‍सवाची समाप्‍ती असून सकाळी १० वाजता ‘श्रीं’चा ‘निर्याण काल’ साजरा केला जाणार आहे.