७ लाखांच्या दंडाची वसुली !
नागपूर – मध्य रेल्वेकडून नियमित प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (‘आर्.पी.एफ्.’ने) अनधिकृत तिकीट विक्रेत्यांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम आणि सखोल पडताळणी मोहीम चालू केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर दलालीची ४०२ प्रकरणे नोंदवण्यात आली. ४७३ लोकांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली. यामध्ये ७ लाख १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
१. मुंबई विभाग या सूचीत पुढे आहे. तिथे शुल्क घेतल्याची २४३ प्रकरणे नोंदवण्यात आली असून २८८ लोकांना अटक करून २ लाख ९२ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
२. भुसावळ मंडळात ६७ गुन्हे नोंद करण्यात आले असून ७२ जणांना अटक करण्यात आली आहे. येथे २ लाख १ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
३. नागपूर विभागात ३४ गुन्हे नोंद करण्यात आले असून ३८ जणांना १ लाख ८० सहस्र रुपयांच्या दंडासह अटक करण्यात आली आहे.
४. पुणे विभागात ५१ गुन्हे नोंद करून ६८ जणांना अटक करून ३० सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
५. सोलापूर येथे ७ गुन्हे नोंद करून ७ जणांना ७ सहस्र रुपयांसह अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रेल्वेतून अनधिकृत प्रवास केला जाणे म्हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम होय ! |