सनातन धर्माला अपकीर्त करणार्‍यांचे कटकारस्‍थान हाणून पाडा ! – महंत राजनाथ योगी महाराज

आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्‍थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना वेळीच त्‍यांची जागा दाखवा, असे आवाहन महंत राजनाथ योगी महाराज यांनी केले.

कोल्‍हापूरचा ‘शाही दसरा’ राज्‍यशासनाकडून ‘राज्‍य महोत्‍सव’ म्‍हणून घोषित !

कोल्‍हापूरचा शाही दसरा हा राज्‍यशासनाने ‘राज्‍य महोत्‍सव’ म्‍हणून घोषित केला आहे. यानिमित्ताने जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने १५ ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

नवरात्रोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्‍या स्‍वच्‍छतेस प्रारंभ !

कोल्‍हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दर्शनासाठी भाविक केवळ महाराष्‍ट्रच नव्‍हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तसेच अन्‍य राज्‍यांतूनही मोठ्या प्रमाणात येतात. आता सर्वसाधारणपणे प्रतिदिन ५ सहस्र भाविक दर्शन घेत आहेत. नवरात्रात हा आकडा लाखात जातो. त्‍यामुळे यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

रुग्‍णालयातील मृत्‍यूंच्‍या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी व्‍हावी ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्‍यमंत्री

राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये सर्वसामान्‍यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्‍यात आले आहे ? आरोग्‍ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्‍येच आहेत.

सातारा जिल्‍ह्यात डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्‍ण !

सातारा जिल्‍ह्यात पावसामुळे डासांच्‍या उत्‍पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्‍ह्यात डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे रुग्‍ण आढळून येत आहेत. वर्ष २०२३ मध्‍ये आतापर्यंत डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्‍ण आढळून आले आहेत.

पुणे येथील वारजे पुलाखाली नदीपात्रात महापालिकेचा शेकडो ट्रक माती आणि राडारोडा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते असे म्हणून विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ बांधणार्‍या पुणे महापालिकेचा हिंदुद्वेष्टेपणा ! भाविकांनीच याचा जाब पालिकेला विचारायला हवा आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा !

सर्वत्रच्‍या अशा पोलिसांवर कारवाई व्‍हावी !

पोलीस ठाण्‍यातील कोठडीत एका व्‍यक्‍तीला विनाकारण ३० मिनिटे डांबणार्‍या देहलीतील २ पोलीस उपनिरीक्षकांना देहली उच्‍च न्‍यायालयाने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. त्‍यांच्‍या वेतनातून हे पैसे वसूल करण्‍यात येणार आहेत.

कॅनडाला धडा शिकवा, त्‍याचा भारत बनवून त्‍याच्‍यावर राज्‍य करा !

‘गेल्‍या काही दिवसांपासून कॅनडा चर्चेत आहे. तेथील खलिस्‍तानी समर्थक भारताला विविध प्रकारे त्रास देत असतात. मध्‍यंतरी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या वक्‍तव्‍याला माध्‍यमांनी पुष्‍कळ प्रसिद्धी दिली होती.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्‍या धर्माभिमानी कुलगुरु शांतीश्री पंडित !

‘१७.९.२०२३ या दिवशी देहलीच्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (‘जे.एन्.यू.’तील) एका कार्यक्रमात कुलगुरु शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी काही महत्त्वाचे सूत्र उपस्‍थित केली. या वेळी त्‍यांनी विद्यापिठातील काही विचित्र आणि आश्‍चर्यकारक गोष्‍टींविषयी भाष्‍य केले.

न्‍यायव्‍यवस्‍थेचा भेदभाव ?

‘‘सर्वोच्‍च न्‍यायालयाने मनीष कश्‍यप यांना दंड ठोठावला; पण ‘एडिटर्स गिल्‍ड’ या वृत्तसंस्‍थेला निर्दोष सोडले. त्‍यांच्‍या मते मनीष कश्‍यप यांनी मणीपूर दंगलीप्रकरणी चुकीची माहिती पसरवली; पण तीच बातमी ‘एडिटर्स गिल्‍ड’नेही छापली होती.