छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.

५ नोव्‍हेंबर या दिवशी राज्‍यातील २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुका !

नक्षलवादामुळे निवडणुका लवकर आटोपाव्‍या लागतात. स्‍वातंत्र्यानंतर इतकी वर्षे चाललेल्‍या या परिस्‍थितीमध्‍ये कधी सुधारणा होणार ?

नागपूर येथील शासकीय रुग्‍णालयांत २४ घंट्यांत २५ रुग्‍णांचा मृत्‍यू नाही ! – डॉ. सागर पांडे, वैद्यकीय अधीक्षक

मेयो आणि मेडिकल या दोन्‍ही रुग्‍णालयांत अत्‍यवस्‍थ अन् ‘व्‍हेंटिलेटर’वरील रुग्‍णांचे दिवसाला ५-६ मृत्‍यू होत आहेत, अशी माहिती मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी दिली.

म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सरकारकडे २४ ऑक्टोबरपर्यंतच मुदत !

गोवा खंडपिठाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या राज्य सरकारच्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात १० नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. परंतु गोवा खंडपिठाने दिलेली ३ मासांची मुदत त्यापूर्वीच संपत आहे !

गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन २ कोटी रुपयांची उलाढाल !

अनैतिक व्यवसायांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल ? पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? राज्यात चालणारे असे अनैतिक व्यवहार कायमचे बंद होण्यासाठी आता जनतेनेच जागृत आणि सतर्क रहाण्याची वेळ आली आहे !

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गोव्यात आल्याचे वृत्त गोवा पोलिसांनी नाकारले !

या ३ आतंकवाद्यांनी गोव्यानजीकच्या कर्नाटक राज्यातील वनक्षेत्रात बाँबस्फोटाची चाचणी केली होती; मात्र या वेळी आतंकवाद्यांनी गोव्यात प्रवेश केला नव्हता. या प्रकरणी देहली पोलिसांकडून आम्हाला अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

आपत्काळात वाचण्यासाठी साधना करा !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१
अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्काळात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत (राजस्‍थान) येथे विविध शाळा आणि गणेशोत्‍सव मंडळे यांमध्‍ये प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत भागातील स्‍थानिक शाळा आणि गणेश मंडळे यांच्‍यामध्‍ये ‘आदर्श गणेशोत्‍सव साजरा कसा करावा ?’, याविषयी प्रबोधन करण्‍यात आले.

शेंद्रे (सातारा) गावच्‍या सीमेतून ४७ लाख रुपयांचा गुटखा शासनाधीन !

गुटखाबंदी असतांना लाखो रुपयांच्‍या गुटख्‍याची अवैध वाहतूक होतेच कशी ? याच्‍या मुळाशी जाणे आवश्‍यक आहे !

बोंडारवाडी प्रकल्‍पासह कृष्‍णा प्रकल्‍पाच्‍या सुधारित जलनियोजनास शासकीय मान्‍यता !

जावळी तालुक्‍यातील ५४ गावांचा शेती आणि पिण्‍याचे पाणी यांचा प्रश्‍न बोंडारवाडी धरण प्रकल्‍पामुळे मार्गी लागला आहे. १ टी.एम्.सी.चे बोंडारवाडी धरण बांधण्‍यासाठी कृष्‍णा प्रकल्‍पाच्‍या सुधारित जलनियोजनास जलसंपदा विभागाने मान्‍यता दिली आहे.