शेंद्रे (सातारा) गावच्‍या सीमेतून ४७ लाख रुपयांचा गुटखा शासनाधीन !

सातारा, ४ ऑक्‍टोबर (वार्ता.) – येथील शेंद्रे गावच्‍या सीमेत महामार्गावर एका कंटेनरमधून प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला, तंबाखू आणि जाफरानी जर्दा यांची अवैध वाहतूक चालू होती. याविषयी स्‍थानिक गुन्‍हे शाखेला माहिती मिळताच त्‍यांनी कारवाई करत ४७ लाख १ सहस्र ९२० रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला, तसेच २० लाख रुपयांचा कंटेनर कह्यात घेत चालक गुफारान शमीम खान यांना अटक केली आहे.

गुटखाबंदी असतांना लाखो रुपयांच्‍या गुटख्‍याची अवैध वाहतूक होतेच कशी ? याच्‍या मुळाशी जाणे आवश्‍यक आहे !