इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गोव्यात आल्याचे वृत्त गोवा पोलिसांनी नाकारले !

आतंकवाद्यांचा गोव्यानजीकच्या वनक्षेत्रांत वावर; मात्र गोव्यात प्रवेश नव्हता ! – गोवा पोलीस

पणजी, ४ ऑक्टोबर (वार्ता.) : इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी रासायनिक बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यासाठी गोव्यासह देशातील एकूण १८ ठिकाणी भेट दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसारित झाले आहे; मात्र गोवा पोलिसांनी इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गोव्यात आल्याचे वृत्त नाकारले आहे.

इस्लामिक स्टेटचे ‘वॉन्टेड’ आतंकवादी

देहली येथे अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांनी पश्चिम घाटातील वनक्षेत्रांमध्ये अनेक मास बाँबस्फोटाची चाचणी केल्याची माहिती अन्वेषणातून उघड झाली होती. वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ३ आतंकवाद्यांनी गोव्यानजीकच्या कर्नाटक राज्यातील वनक्षेत्रात बाँबस्फोटाची चाचणी केली होती; मात्र या वेळी आतंकवाद्यांनी गोव्यात प्रवेश केला नव्हता. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या मते, या प्रकरणी गोवा पोलिसांना आतापर्यंत देहली पोलिसांकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


सविस्तर वृत्त वाचा –

राजधानी देहलीत इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती !
https://sanatanprabhat.org/marathi/723951.html