हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत (राजस्‍थान) येथे विविध शाळा आणि गणेशोत्‍सव मंडळे यांमध्‍ये प्रबोधन !

सोजत येथील एका गणेशोत्सव मंडळात मार्गदर्शन करतांना अर्चना लढ्ढा

सोजत (राजस्‍थान) – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत भागातील स्‍थानिक शाळा आणि गणेश मंडळे यांच्‍यामध्‍ये ‘आदर्श गणेशोत्‍सव साजरा कसा करावा ?’, याविषयी प्रबोधन करण्‍यात आले. या अंतर्गत समितीच्‍या अर्चना लढ्ढा यांनी गणेशमूर्ती स्‍थापनेपासून विसर्जनापर्यंतच्‍या सर्व कृतींविषयी शास्‍त्रीय माहिती उपस्‍थितांना सांगितली.

सोजत येथील एका शाळेत गणेशोत्सवाविषयी मार्गदर्शन करतांना अर्चना लढ्ढा

१. दयावती सेकंडरी स्‍कूल, नालंदा स्‍कूल, शारदा विद्यापीठ सेकंडरी स्‍कूल या विद्यालयांमध्‍ये आदर्श गणेशोत्‍सव साजरा करण्‍याविषयी प्रबोधन करण्‍यात आले. या वेळी विद्यार्थ्‍यांनी आदर्श उत्‍सव साजरा करण्‍याविषयी संकल्‍प केला.

२. श्री बाबा रामदेव नवयुवक मंडळ, श्री भूतेश्‍वर मित्रमंडळ, निम्‍बेश्‍वर महादेव मंडळ या मंडळांमध्‍येही प्रबोधन करण्‍यात आले. या मंडळांनीही चित्रपट गीतांऐवजी भक्‍तीसंगीत लावण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला.

३. याप्रसंगी स्‍थानिक धर्मप्रेमी आणि ज्‍योतिषाचार्य श्री. दीपक वैष्‍णव, भाजप मंडल महिला मोर्चा मंत्री कौशल्‍या मेवाडा, दुर्गा वाहिनीच्‍या रौनक चावला, सनातन संस्‍थेचे श्री. दीपक लढ्ढा आदी उपस्‍थित होते.