निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्‍हे लपवल्‍याच्‍या आरोपातून उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्‍त !

वर्ष २०१४ मधील विधानसभेच्‍या निवडणुकीच्‍या वेळी प्रविष्‍ट केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ गुन्‍हेगारी खटल्‍यांची माहिती दिली नसल्‍याच्‍या आरोपाच्‍या प्रकरणी प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी एस्.एस्. जाधव यांनी फडणवीस यांना दोषमुक्‍त केले आहे.

आज समयमर्यादेनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्‍यास सलाईन काढणार !

मनोज जरांगे म्‍हणाले की, सरकारसाठी आम्‍ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता; मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्‍ही सरकारच्‍या निरोपाची वाट पहात आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव घोषित करणार नाही.

पोपटांची तस्‍करी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक : ५०० पोपट जप्‍त

उत्तरप्रदेश पोलिसांच्‍या विशेष कृती दलाने पोपटांच्‍या तस्‍करीच्‍या प्रकरणी बंगालमधील महंमद वसीम उपाख्‍य अरमान, महंमद आसिफ आणि इंजमाम यांना अटक केली आहे. या पोपटांची तस्‍करी तांत्रिक विधी, तसेच अन्‍य कामांसाठी केली जाते. हे तिन्‍ही तस्‍कर पोपटांना पकडून बिहार, बंगाल, ओडिशा आदी राज्‍यांमध्‍ये तस्‍करी करत होते. 

‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांचा लंडनच्‍या आस्‍थापनासमवेत करार

जिल्‍ह्यातील लांजा येथील ‘फणस किंग’ म्‍हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्‍या ‘जॅक फ्रूट ऑफ इंडिया’ या आस्‍थापनाने लंडनमधील ‘सर्क्‍युलरिटी इनोव्‍हेशन हब’ (‘CIH’) या आस्‍थापनासमवेत अर्थव्‍यवस्‍थेला चालना देण्‍यासाठी महत्त्वाचा सामंजस्‍य करार केला आहे.

उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनबादमधील रणधीर वर्मा चौकात एक दिवसीय आंदोलनात करण्‍यात आली.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्‍या महागाई भत्त्यामध्‍ये ४ टक्‍के वाढ !

राज्‍यशासनाने एस्.टी. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ३४ वरून ३८ टक्‍के केला आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ सप्‍टेंबर या दिवशी याला मान्‍यता दिली. यासाठी ९ कोटी रुपये इतका निधी लागणार आहे.

म्हणे शिक्षणसम्राट !

‘एका तरी शिक्षणसम्राटाने ऋषिमुनींसारखे शिक्षणक्षेत्रात कार्य केले आहे का ? हल्लीचे शिक्षणसम्राट म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक पैसे मिळवणारे सम्राट !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गायीच्‍या शेणापासून सिद्ध केलेल्‍या साबणामुळे त्‍वचाविकार होत नाहीत ! – चंद्रकांत पाटील

गायीपासून मिळणार्‍या उत्‍पादनांचे अनन्‍य साधारण महत्त्व लक्षात घेऊन गोरक्षण करणे किती आवश्‍यक आहे, हे शासनाने लक्षात घ्‍यायला हवे.

पंचनाम्‍यातील अनेक नोंदी पोलिसांनी सांगितल्‍यामुळे पंचांनी नमूद केल्‍या ! – अधिवक्‍ता अनिल रुईकर

घरझडतीत जप्‍त केलेली पुस्‍तके आणि पत्रके यांवर समीर गायकवाड यांचे नाव नाही, ‘एखाद्या गोष्‍टीचे प्रबोधन करणे’ म्‍हणजे आक्षेपार्ह आहे का ? समीर गायकवाड यांच्‍या ‘डायरी’त अनेक नावे आणि लिखाण असतांना केवळ एका विशिष्‍ट व्‍यक्‍तीचेच नाव पंच पटेल यांनी नमूद केले.

मराठ्यांना आरक्षण द्या, अन्‍यथा समान नागरी कायदा लागू करा ! – मुधोजीराजे भोसले, भोसले घराण्‍याचे विद्यमान वंशज

राजघराणे आणि उद्योजक यांना आरक्षण नको; पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षण यांसाठी आरक्षण हवे आहे. आम्‍हाला राजकीय आरक्षण नकोच. एकदा समान नागरी कायदा लागू झाला, तर प्रत्‍येकाला आपापल्‍या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी.