
नागपूर – वर्ष २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नसल्याच्या आरोपाच्या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस्.एस्. जाधव यांनी फडणवीस यांना दोषमुक्त केले आहे. ‘या गुन्ह्यांचा परिणाम निवडणुकीवर होईल असे नाही, तसेच त्यांनी कुठल्या हेतूने हे गुन्हे लपवले ?, हेही सिद्ध होत नाही. त्यामुळे फडणवीस यांना दोषमुक्त करण्यात येत आहे’, असा निकाल न्यायाधीश जाधव यांनी दिला. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर ५ सप्टेंबर या दिवशी निकाल घोषित केला जाणार होता; मात्र न्यायालयाने तो राखून ठेवून ८ सप्टेंबर या दिवशी तो घोषित करण्यात आला.
‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी सेवेची संतपरंपरा आणि आरोग्याचा मिलाप !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !