प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने पोपटांच्या तस्करीच्या प्रकरणी बंगालमधील महंमद वसीम उपाख्य अरमान, महंमद आसिफ आणि इंजमाम यांना अटक केली आहे. या पोपटांची तस्करी तांत्रिक विधी, तसेच अन्य कामांसाठी केली जाते. हे तिन्ही तस्कर पोपटांना पकडून बिहार, बंगाल, ओडिशा आदी राज्यांमध्ये तस्करी करत होते.
पोपटांना कसे पकडले जाते ?
पोपटांच्या घरट्यांतून पिल्लांना नेले जाते. पोपटांचा थवा असल्यास जाळे टाकून त्यांना पकडले जाते, तसेच मळलेल्या पिठामध्ये गुळ आणि गुंगीचे औषध टाकून त्याच्या लहान गोळ्या बनवल्या जातात. त्या पोपटांना खाण्यासाठी ठेवल्या जातात. त्या खाल्ल्यावर पोपट बेशुद्ध पडतात.