छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नक्कलची (कॉपीची) ३ लाख रुपयांना विक्री !  

छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नक्कलची (कॉपीची) ३ लाख रुपयांना विक्री !  

परीक्षार्थींना उत्तरे पुरवणार्‍या टोळीमध्ये ७ जण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याने पोलीस त्याच दिशेने अन्वेषण करत आहेत.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

वर्ष २०२१ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात कौशल्य विकास घोटाळ्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. २५० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामध्ये चंद्रबाबू हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे अजामीनपात्र आहेत.

मोरोक्कोमधील भूकंपामध्ये ८२० हून अधिक जणांचा मृत्यू !

मोरोक्कोमधील भूकंपामध्ये ८२० हून अधिक जणांचा मृत्यू !

आफ्रिका खंडातील मोरोक्को देशात ९ सप्टेंबरच्या पहाटे ६.८ रिक्टर स्केलचा भूकंप होऊन यात ८२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५३ जण घायाळ झाले आहेत.

अकृषी विद्यापिठांकडून इंग्रजी अभ्‍यासक्रमाचे मराठीतून भाषांतर नाही !

अकृषी विद्यापिठांकडून इंग्रजी अभ्‍यासक्रमाचे मराठीतून भाषांतर नाही !

यावरून अकृषी विद्यापिठांना मराठी भाषेविषयी किती आपुलकी आणि प्रेम आहे, हे दिसून येते.
मराठीत भाषांतर न करणार्‍या विद्यापिठांवर कारवाई केली पाहिजे.

अजित पवार यांसह राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या ३१ आमदारांना अपात्र करावे !

अजित पवार यांसह राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या ३१ आमदारांना अपात्र करावे !

अजित पवार यांसह सत्तेत सहभागी झालेल्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या सर्व मंत्र्यांचाही समावेश आहे. त्‍यामुळे शरद पवार आणि अजित पवार या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या दोन्‍ही गटांमध्‍ये पक्षाचे नाव अन् पक्षचिन्‍ह यांसाठी संघर्ष चालू होण्‍याची शक्‍यता आहे.

पुण्‍यात दहीहंडीसाठीच्‍या ध्‍वनीवर्धक व्‍यवस्‍थेचे ‘स्‍टेज’ कोसळले !

पुण्‍यात दहीहंडीसाठीच्‍या ध्‍वनीवर्धक व्‍यवस्‍थेचे ‘स्‍टेज’ कोसळले !

पांगळु आळी येथे श्रीकृष्‍ण मंडळाच्‍या दहीहंडीसाठी ध्‍वनीवर्धक व्‍यवस्‍था उभारत असतांना दुचाकीचा धक्‍का लागून ‘स्‍टेज’ कोसळले.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्‍हे लपवल्‍याच्‍या आरोपातून उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्‍त !

निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्‍हे लपवल्‍याच्‍या आरोपातून उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्‍त !

वर्ष २०१४ मधील विधानसभेच्‍या निवडणुकीच्‍या वेळी प्रविष्‍ट केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ गुन्‍हेगारी खटल्‍यांची माहिती दिली नसल्‍याच्‍या आरोपाच्‍या प्रकरणी प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी एस्.एस्. जाधव यांनी फडणवीस यांना दोषमुक्‍त केले आहे.

आज समयमर्यादेनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्‍यास सलाईन काढणार !

आज समयमर्यादेनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्‍यास सलाईन काढणार !

मनोज जरांगे म्‍हणाले की, सरकारसाठी आम्‍ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता; मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्‍ही सरकारच्‍या निरोपाची वाट पहात आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव घोषित करणार नाही.

पोपटांची तस्‍करी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक : ५०० पोपट जप्‍त

पोपटांची तस्‍करी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक : ५०० पोपट जप्‍त

उत्तरप्रदेश पोलिसांच्‍या विशेष कृती दलाने पोपटांच्‍या तस्‍करीच्‍या प्रकरणी बंगालमधील महंमद वसीम उपाख्‍य अरमान, महंमद आसिफ आणि इंजमाम यांना अटक केली आहे. या पोपटांची तस्‍करी तांत्रिक विधी, तसेच अन्‍य कामांसाठी केली जाते. हे तिन्‍ही तस्‍कर पोपटांना पकडून बिहार, बंगाल, ओडिशा आदी राज्‍यांमध्‍ये तस्‍करी करत होते. 

‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांचा लंडनच्‍या आस्‍थापनासमवेत करार

‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांचा लंडनच्‍या आस्‍थापनासमवेत करार

जिल्‍ह्यातील लांजा येथील ‘फणस किंग’ म्‍हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्‍या ‘जॅक फ्रूट ऑफ इंडिया’ या आस्‍थापनाने लंडनमधील ‘सर्क्‍युलरिटी इनोव्‍हेशन हब’ (‘CIH’) या आस्‍थापनासमवेत अर्थव्‍यवस्‍थेला चालना देण्‍यासाठी महत्त्वाचा सामंजस्‍य करार केला आहे.