मनोज जरांगे पाटील यांच्‍याकडून सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा !

मनोज जरांगे पाटील

मुंबई – मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा दिली आहे. ‘आरक्षण घेतल्‍याविना शांत बसणार नाही. गिरीश महाजन यांनी आम्‍हाला ‘सरसकट मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतो’, असे सांगितले आहे. ‘आम्‍ही वेळ दिला आहे, आता टिकणारे आरक्षण द्या’, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जालना येथील अंतरवली सराटी गावात त्‍यांचे आंदोलन चालू आहे. मराठा समाजाशी संवाद साधण्‍यासाठी दौराही करणार असल्‍याचे त्‍यांनी पत्रकारांना सांगितले. ५ सहस्र कुणबी नोंदी पुराव्‍यासाठी पुष्‍कळ आहेत. मी पूर्वीपासून सांगतो आणि आताही सांगतो की, मराठ्यांना कुणबी दाखले देण्‍यासाठी कसल्‍याही पुराव्‍याची आवश्‍यकता नाही. वर्ष २००४ च्‍या शासन आदेशानुसार, मराठा आणि कुणबी यांना सरसकट प्रमाणपत्रे देता येतात.