जय जय जय श्री गुरुदेवा । करितो मी तुझी चरण सेवा ॥
गंधपुष्प हे अर्पूनी तुजला ।
नित्य नमितो तव चरणाला ।
गंधपुष्प हे अर्पूनी तुजला ।
नित्य नमितो तव चरणाला ।
‘माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यानंतर जेव्हा जेव्हा आश्रमातील भोजनकक्षात माझी सद़्गुरु राजेंद्रदादांशी भेट व्हायची, तेव्हा ते माझी प्रेमपूर्वक चौकशी करायचे. त्या वेळी त्यांना त्रासानुरूप नामजपादी उपाय विचारल्यावर ते लगेच उपायही सांगायचे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर २४ घंटे भाविकांसाठी उघडे असते. ‘श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपाछत्राखाली राहिल्यानंतर आता संत श्री बाळूमामा यांनीच मला येथे बोलावून घेतले’, अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे भाविकांना ज्या सर्व सुविधा देणे अपेक्षित आहे, त्या सर्व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा तांत्रिक पालट केलेला (मॉर्फ केलेला) आक्षेपार्ह व्हिडिओ ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’वर ठेवल्याप्रकरणी सांताक्रूझ येथे रहाणारा शाहबाज तस्लीम खान (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्ट या दिवशी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. ‘भारताला वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू. देशाचे संरक्षण करणार्यांप्रती सन्मान बाळगू आणि देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू, अशी पंचप्रण शपथ या वेळी सर्वांनी घेतली.
अगणित हुतात्म्यांचा त्याग आणि बलीदान यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आपण समारोप करणार आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद़्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. केंद्रशासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या सांगतेच्या निमित्ताने देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार आहे.
नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाही संदेश पाठवण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार समितीची बैठक पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात सर्वानुमते वैद्य यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात ५ प्रकल्पांची कामे वेगाने चालू आहेत. यामध्ये प्रत्येक प्रकल्पाची वीजनिर्मितीची क्षमता निश्चित करण्यात आली असून वर्ष २०२४-२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.