असे आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी !
रामनाथ (अलिबाग) – मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे प्रशासन आणि सरकार यांचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने महामार्गावर वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. वडखळ ते इंदापूर या मार्गाची सध्या दुःस्थिती झालेली आहे. महामार्गाच्या या स्थितीकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
Mumbai Goa Highway Potholes : मुंबई- गोवा महामार्गावर पत्रकारांचे बोंबाबोंब आंदोलनhttps://t.co/0zYTahgLRR#mumbaiGoa #Highwaypatholes #maharashtra #Lokshahimarathi #journalistprotest
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) August 9, 2023
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाही संदेश पाठवण्यात आले.