जय जय जय श्री गुरुदेवा । करितो मी तुझी चरण सेवा ॥

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सौ. तेजा म्‍हार्दोळकर या सनातनच्‍या ‘ऑनलाईन’ होणार्‍या ‘राष्‍ट्रीय सत्‍सेवा सत्‍संगा’त सहभागी असतात. त्‍या माध्‍यमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्‍यांना या सत्‍संगाच्‍या माध्‍यमातून साधनेचे महत्त्व कळले असून त्‍या काही प्रासंगिक सेवांमध्‍ये सहभागी होतात, उदा. गुरुपौर्णिमेचे अर्पण गोळा करणे, शाळेतील मुलांना नामस्‍मरणाचे महत्त्व सांगणे, घरगुती कार्यक्रमांसाठी ग्रंथ अन् इतर उत्‍पादने यांची मागणी घेणे इत्‍यादी. ‘गुरुदेवांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) त्‍यांना सत्‍संग आणि सत्‍सेवा यांच्‍या माध्‍यमातून सनातन संस्‍थेशी जोडून ठेवले आहे’, यासाठी त्‍यांना पुष्‍कळ कृतज्ञता वाटते. गुरुदेवांची मानसपूजा करतांना त्‍यांना सुचलेली आणि ‘राष्‍ट्रीय सत्‍सेवा सत्‍संगा’त त्‍यांनी म्‍हणून दाखवलेली आरती येथे दिली आहे.’- सौ. ज्‍योत्‍स्ना रविकांत नारकर, देवगड (सिंधुदुर्ग).

सौ. तेजा म्‍हार्दोळकर

जय जय जय श्री गुरुदेवा (टीप १) ।
करितो तुझी चरण सेवा ॥  धृ. ॥

गंधपुष्‍प हे अर्पूनी तुजला ।
नित्‍य नमितो तव चरणाला ।
अनुभवतो तुझी अगाध कृपा ।
हे कृपाळा, हे दयाळा (टीप २) ॥ १ ॥

तू प्रीतीचा अथांग सागर ।
अपार माया करतो आम्‍हावर ।
तुझी कृपा साधकांवर निरंतर ।
हे जगदीशा, हे परमेशा ॥ २ ॥

नित्‍य करता तुझे स्‍मरण ।
मिळे आम्‍हा नवचैतन्‍य ।
आध्‍यात्‍मिक बळ देई सकळा ।
हे गोपाळा, हे घननिळा, हीच प्रार्थना तव चरणां ॥ ३ ॥

टीप १ : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

टीप २ : ‘कृपाळा, दयाळा, जगदीशा, परमेशा, गोपाळा, घननिळा’, हे सर्व शब्‍द सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उद्देशून वापरले आहेत.

– सौ. तेजा मनोज म्‍हार्दोळकर, म्‍हार्दोळ, गोवा. (२५.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक