छत्रपती शिवरायांचा आक्षेपार्ह व्‍हिडिओ ठेवणार्‍या धर्मांधाला अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा तांत्रिक पालट केलेला (मॉर्फ केलेला) आक्षेपार्ह व्‍हिडिओ ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप स्‍टेटस’वर ठेवल्‍याप्रकरणी सांताक्रूझ येथे रहाणारा शाहबाज तस्‍लीम खान (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. ( छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्‍या इतिहासद्वेष्‍ट्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी ! – संपादक) श्री. सचिन पाठक यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्‍ट केली होती. अटक केल्‍यानंतर खानने ‘हे चुकून केले’, असे म्‍हटले. न्‍यायालयाने त्‍याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.