
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्ट या दिवशी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. ‘भारताला वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू. देशाचे संरक्षण करणार्यांप्रती सन्मान बाळगू आणि देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू, अशी पंचप्रण शपथ या वेळी सर्वांनी घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अन्य मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या पोस्टल तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
| पंचप्रण शपथ म्हणजे काय ?
भारताला २०४७ पर्यंत विकसित बनवण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता आणि एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष रहाण्याची, नागरिकाचे कर्तव्य बजावण्याची आणि देशाचे रक्षण करणार्यांचा कायम आदर राखण्याची शपथ ही पंचप्रण शपथ आहे. |
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त