निकृष्ट काम करणार्या कंत्राटदारालाच आणखी २ कामे !
वणी (यवतमाळ), ९ ऑगस्ट (वार्ता.) – येथील साईमंदिर ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्याचे काम जे.पी. कन्स्ट्रक्शन आस्थापनाला दिलेले आहे. २२ कोटी रुपयांचे काम कोणत्याही अटी, शर्ती पूर्ण न करता, तसेच निकृष्ट दर्जाचे काम असूनही ५ कोटी रुपयांचे देयक देण्यात आले. शहरातील आणखी २ रस्त्यांची कामे याच आस्थापनाला देण्यात आली. ‘या आस्थापनाला काळ्या सूचीत टाकावे आणि याला कारणीभूत अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)