मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : ३ कुकी आतंकवादी ठार !

उखरूल जिल्ह्यातील थवई गावात मैतेई आणि कुकी आतंकवादी यांच्यामध्ये गोळीबार झाला.

सातारा येथे पत्रकारांनी केली पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी !

पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्‍यामुळे हा कायदा कुचकामी ठरला आहे. त्‍यामुळे सातारा जिल्‍ह्यातील सहस्रो पत्रकारांनी एकत्र येत पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी केली.

काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

सोपोर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

दांपत्‍याने केलेल्‍या मारहाणीत रूळांवर पडलेल्‍याचा रेल्‍वेखाली चिरडून मृत्‍यू !

समाजात संयमच राहिला नसल्‍याचे दर्शवणारी घटना !

श्रावण मासात त्र्यंबकेश्‍वर मंदिर दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले ! 

अधिक मास समाप्‍तीनंतर श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. जिल्‍ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिरात श्रावण मासात भाविकांची अलोट गर्दी असते. या पार्श्‍वभूमीवर त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थान विश्‍वस्‍तांनी  दर्शनासाठी मंदिर प्रतिदिन पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत, तर एकूण ४ श्रावणी सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असणार, असा निर्णय घेतला आहे. 

‘नाटो’ देशांनी बेलारूसवर आक्रमण केले, तर अणूबाँबने प्रत्युत्तर देऊ !  

आम्ही अणूबाँब कुणाला घाबरवण्यासाठी आणलेले नाहीत. आमच्यावर आक्रमण झाले, तर आम्ही शांत बसणार नाही आणि वाटही पहाणार नाही. आमच्या संरक्षणासाठी आमच्या शस्त्रांचा पुरेपूर वापर करू.

पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे २ अल्‍पवयीन युवतींच्‍या अपहरणाचा धर्मांधांनी केलेला प्रयत्न फसला !

चंदगड तालुक्‍यातील एका तालुक्‍यातील एक अल्‍पवयीन युवती सकाळी शाळेत जाते म्‍हणून गेली ती शाळेत पोचलीच नसल्‍याचे तिच्‍या पाल्‍यांच्‍या लक्षात आले. त्‍यामुळे तिच्‍या पालकांनी पोलीस ठाण्‍यात तशी तक्रार दिली.

आज मुंबई येथे साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन सोहळा !

स्‍थळ : लक्ष्मीनारायण बाग, तळमजला (वातानुकूलित सभागृह), बाळ गोविंदास रोड, यशवंत नाट्यगृहाच्‍या शेजारी, बाँबे ग्‍लास हाऊसच्‍या बाजूला, माटुंगा (प.), मुंबई.
संपर्क : ९८२१०१५६१९

‘इंस्‍टाग्राम’वर देवतांचे विडंबन करणारी बनावट खाती आणि चालक यांवर कारवाई करा ! – अधिवक्‍ता महेश धांडे

महापुरुष आणि देवता यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍यासाठी सक्षम कायदा शासनकर्ते केव्‍हा करणार आहेत ?

छतरपूरचे माजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येकी ७ दिवसांच्या कारावासाची शिक्षा

शीलेंद्र सिंह आणि अमर बहादुर सिंह यांना याचिकाकर्त्या तथा छतरपूर स्वच्छता अभियानाच्या समन्वयक रचना द्विवेदी यांच्या स्थानांतराच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याविषयी दोषी ठरवले होते.