दांपत्‍याने केलेल्‍या मारहाणीत रूळांवर पडलेल्‍याचा रेल्‍वेखाली चिरडून मृत्‍यू !

शीव रेल्‍वे स्‍थानकावरील घटना !

शीव (मुंबई) – शीव रेल्‍वे स्‍थानकावर दिनेश राठोड याचा धक्‍का लागल्‍याने शीतल माने या महिलेने त्‍याला छत्रीने मारले. शीतल यांचे पती अविनाश यांनीही त्‍याला जोरात ठोसा दिला. त्‍यामुळे दिनेश रेल्‍वे रूळावर पडला. त्‍याच वेळी समोरून येणार्‍या रेल्‍वेखाली तो चिरडला गेला. यात दिनेशचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी अपघाती मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली असून माने दांपत्‍याला अटक करण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

समाजात संयमच राहिला नसल्‍याचे दर्शवणारी घटना !