सातारा येथे पत्रकारांनी केली पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी !

आतातरी प्रशासनाने कायद्याची कठोर कार्यवाही करावी !

पत्रकार बांधवांनी एकत्र येत ठिकठिकाणी पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी केली

सातारा, १८ ऑगस्‍ट (वार्ता.) – जळगाव जिल्‍ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्‍यावर झालेल्‍या आक्रमणाच्‍या निषेधार्थ सातारा जिल्‍ह्यातील सहस्रो पत्रकार बांधवांनी एकत्र येत ठिकठिकाणी पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी केली. या वेळी ‘संबंधित आक्रमणकर्त्‍यांना तात्‍काळ अटक करून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी पत्रकारांनी केली.

पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणार्‍या आक्रमणकर्त्‍यांवर पत्रकार आक्रमणविरोधी कायद्यान्‍वये गुन्‍हे नोंद करण्‍यात आले नाहीत. पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्‍यामुळे हा कायदा कुचकामी ठरला आहे. त्‍यामुळे सातारा जिल्‍ह्यातील सहस्रो पत्रकारांनी एकत्र येत पत्रकार आक्रमणविरोधी कायद्याची होळी केली. या वेळी पत्रकारांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.