‘आंतरराष्‍ट्रीय मंदिर अधिवेशन एक्‍स्‍पो २०२३-अधिवेशना’मध्‍ये श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्‍सव सोहळ्‍याची माहिती सादर !

‘आंतरराष्‍ट्रीय मंदिर अधिवेशन एक्‍स्‍पो २०२३-अधिवेशन’ वाराणसी येथे २२ ते २४ जुलै या कालावधीत पार पडले. या अधिवेशनात प्रत्‍यक्ष आणि सामाजिक माध्‍यमे यांद्वारे १ सहस्र ७०० मंदिरांनी सहभाग नोंदवला.

भारतात बहुसंख्‍यांक हिंदू असुरक्षित !

हरियाणातील मुसलमानबहुल नूंह जिल्‍ह्यात हिंदु संघटनेकडून काढण्‍यात आलेल्‍या भगवा यात्रेवर मुसलमानांनी घराच्‍या छतांवरून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या वेळी मुसलमानांकडून हवेत गोळीबार करण्‍यात आल्‍याचेही वृत्त आहे.

पंतप्रधान मोदी यांच्‍या पुणे दौर्‍याला युवक काँग्रेसचा विरोध !

पंतप्रधान मोदी यांच्‍या दौर्‍याचा विरोधकांनी अनेक माध्‍यमांतून निषेध व्‍यक्‍त केला आहे. युवक काँग्रेसच्‍या वतीने पुण्‍यातील परिसरामध्‍ये पोस्‍टर्स (फलक) लावण्‍यात आली आहेत.

नसरापूर येथे (पुणे) भूस्‍खलन होण्‍याची शक्‍यता !

येथील बाजारपेठेमधून बनेश्‍वर मंदिराकडे जाणारा रस्‍ता २६ जुलै या दिवशी सायंकाळी ५ नंतर खचला. या वेळी जिल्‍हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, मंडलाधिकारी आणि नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी घटनास्‍थळी जाऊन ..

रत्नागिरी पाठोपाठ खेड येथेही वेश्याव्यवसाय चालू असल्याचे उघड : २ जण पोलिसांच्या कह्यात !

जिल्ह्यातील अनैतिक प्रकार बंद होण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र धाडी टाकून वेश्याव्यवसाय समूळ नष्ट करणे आवश्यक !

रेल्वे पोलिसाकडून पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार : ४ जणांचा मृत्यू !

रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे.

हिंदु धर्मास लागलेली ‘लव्‍ह जिहाद’ची कीड मुळासकट उखडून टाका ! – धनंजय देसाई, प्रमुख, हिंदु राष्‍ट्र सेना

फुलंब्री तालुक्‍यात मागील २ मासांपासून ‘लव्‍ह जिहाद’च्‍या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न उघड झाला होता.

सरंद (तालुका संगमेश्वर) गावातील लोखंडी साकव वाहून गेला : अनेक वाड्या आणि आंबव गावाचा संपर्क तुटला

या मुसळधार पावसामुळे आलेल्या जोरदार पाण्यामुळे सरंद गावातील जाधववाडी येथील ओढ्यावर असणारा लोखंडी साकव तुटून वाहून गेला.

गोरक्षकांच्‍या वतीने पुणे पोलिसांना निवेदन !

गोवंश हत्‍याबंदी कायदा राज्‍यात लागू असूनही गोतस्‍करांना त्‍याचा धाक नाही, हेसुद्धा लक्षात येते. गोवंशियांसाठी सुरक्षित वातावरण पोलीस राज्‍यात कधी निर्माण करणार ?

बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याच्या प्रकरणी त्यांनी हे मत व्यक्त केले. गांधींचा एवढा पुळका होता, तर काँग्रेसने या पुस्तकावर बंदी का घातली नाही ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.