रत्नागिरी – जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचवड वेताळवाडी परिसरातील ‘दवाबिंदू फार्महाऊस’वरती वेश्याव्यवसाय प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. या घटनेत पोलिसांनी रवींद्र गणपत गावडे आणि एक महिला आरोपी यांवर भा.दं.वि. कलम ३७०, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम अनुसार गुन्हा नोंद करून दोघांना कह्यात घेतले आहे.
नुकतेच शहरातील शिवाजीनगर या उच्चभ्रू परिसरात शहर पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणार्यांच्या विरोधात मोठी कारवाई करून ६ जणांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातही अशीच घटना उघड झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २८ जुलै या दिवशी पोलिसांनी खेड-दापोली मार्गावरील ‘फार्महाऊस’ धाड टाकली. संशयित आरोपी रवींद्र गावडे याने आर्थिक अडचणीत असलेल्या पीडित महिलेशी ओळख करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. या वेश्याव्यवसायातून मिळणार्या उत्पन्नावर तो उपजीविका करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांचे आवाहनआपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील किंवा अशा संशयास्पद व्यक्ती आणि घटना आढळून आल्यास तात्काळ ‘टोल फ्री’ क्र. ११२ वर, अथवा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३५२)२२२२२२ वर संपर्क साधावा’, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. |
संपादकीय भूमिका
|