‘आंतरराष्‍ट्रीय मंदिर अधिवेशन एक्‍स्‍पो २०२३-अधिवेशना’मध्‍ये श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्‍सव सोहळ्‍याची माहिती सादर !

कोल्‍हापूर – ‘आंतरराष्‍ट्रीय मंदिर अधिवेशन एक्‍स्‍पो २०२३-अधिवेशन’ वाराणसी येथे २२ ते २४ जुलै या कालावधीत पार पडले. या अधिवेशनात प्रत्‍यक्ष आणि सामाजिक माध्‍यमे यांद्वारे १ सहस्र ७०० मंदिरांनी सहभाग नोंदवला. या अधिवेशनात कोल्‍हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्‍सव सोहळ्‍याविषयीची माहिती देशपातळीवरील सर्व मंदिर व्‍यवस्‍थापन अधिकारी आणि प्रतिनिधी यांच्‍यासमोर सादर करण्‍यात आली. या वेळी दक्षिण काशीप्रमाणे करवीर काशीची माहितीही देण्‍यात आली. ही माहिती दिल्‍यानंतर अधिवेशनाच्‍या संचालकांनी श्री महालक्ष्मी मंदिर व्‍यवस्‍थापनाचे प्रतिनिधी श्री. सुयश पाटील आणि श्री. राहुल जगताप यांचा सत्‍कार केला.

देश पातळीवर आधुनिक डिजिटल सुरक्षा साधने वापरणारे मंदिर नामांकन आणि विजेता या यशानंतर आता आंतरराष्‍ट्रीय पातळीवर देवस्‍थान व्‍यवस्‍थापन समिती, पश्‍चिम महाराष्‍ट्र यांच्‍या कार्याचा गौरव होत आहे. देवस्‍थान समितीचे कार्य, माहिती जगभरातील लोकांपर्यंत पोचवण्‍यासाठी समितीच्‍या वतीने प्रयत्न करण्‍यात येत आहेत. या कार्यक्रमासाठी प्रशासक तथा जिल्‍हाधिकारी श्री. राहुल रेखावार, सचिव श्री. सुशांत किरण बनसोडे, व्‍यवस्‍थापक श्री. महादेव दिंडे, तसेच इतरांचे मार्गदर्शन लाभले.

अधिवेशनात विषय मांडतांना श्री. राहुल जगताप