गोरक्षकांच्‍या वतीने पुणे पोलिसांना निवेदन !

  • पुणे येथील अवैध गोमांस वाहतूक करणारे आणि गोतस्‍कर यांवर योग्‍य ती कारवाई करण्‍यात यावी !

  • गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई होण्‍यासाठी सरकारने लक्ष द्यावे !

पुणे – सध्‍या पुणे शहरात गोहत्‍येवर गोसेवक आणि गोरक्षक यांच्‍या साहाय्‍याने नियंत्रण ठेवण्‍यात आले आहे. त्‍यामुळे पुण्‍याच्‍या बाहेरून गोमांसाची वाहतूक अवैधरित्‍या पुणे शहरात केली जात आहे. हे आमच्‍या निदर्शनास आलेले आहे; म्‍हणून आम्‍ही याविषयी सखोल माहिती घेण्‍याचा प्रयत्न केला असता या सर्व कारस्‍थानामागे कोंढवा येथील सादिक कुरेशी असल्‍याचे आमच्‍या लक्षात आले आहे. सादिक कुरेशी गोरक्षकांवर दबाव आणून त्‍यांना गोरक्षणाच्‍या कार्यापासून परावृत्त करण्‍याचा प्रयत्न करत असतो. त्‍यांना जिवे मारण्‍याच्‍या धमक्‍याही देत असतो. तरी या गंभीर सूत्राचा विचार करून गोरक्षक आणि मानद पशूकल्‍याण अधिकारी यांना संरक्षण देण्‍यात यावे अन् अवैध गोमांस वाहतूक करणारे आणि गोतस्‍कर यांवर योग्‍य ती कारवाई करण्‍यात यावी, असे निवेदन ‘गोरक्षा दल महाराष्‍ट्र राज्‍या’चे उपाध्‍यक्ष राहुल कदम यांनी गोरक्षकांच्‍या वतीने २८ जुलै या दिवशी पुणे पोलिसांना दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्‍यमंत्री आणि गृहमंत्री यांनाही देण्‍यात आली आहे.

 

निवेदनात म्‍हटले आहे की,

१. सादिक कुरेशी हा ज्‍या गाडीत गोमांस असते, त्‍या गाडीसह २ हत्‍यारबंद टोळकी वेगवेगळ्‍या गाड्यांमध्‍ये बसवून संरक्षणासाठी पाठवत असतो.

२. ‘आम्‍ही बर्‍याच गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद केलेले आहेत. पोलीस, तसेच राज्‍यातील काही आमदार, मंत्री यांचाही गोतस्‍करांना छुपा पाठिंबा आहे’, असे सादिक कुरेशी याने सांगितले आहे.

३. ग्रामीण भागातील स्‍थानिक पोलिसांना हाताशी धरून गोमांस तस्‍करीचा अवैध व्‍यवसाय करत असल्‍याचे सादीक याने सांगितले.

पुण्‍याच्‍या बाहेरून पुण्‍यात गोमांस पाठवणारे गोतस्‍कर

सातारा जिल्‍ह्यातील फलटण येथून वाहिद कुरेशी आणि कुणी उजहर भाई यांच्‍याकडून अवैधरित्‍या गोमांसाची वाहतूक केली जाते. भुम परांडा येथून बाबा कुरेशी पुण्‍यात गोमांसाची तस्‍करी करत आहे. अहिल्‍यानगर येथील झेंडीगेट येथील मुजाहिद कुरेशी हा पुणे शहरात गोमांसाची वाहतूक करून तस्‍करी करत असतो.

(गोमांसाची होणारी अवैध वाहतूक आणि तस्‍करी थांबवण्‍यासाठी पोलीस प्रामाणिक, सक्षम आणि कर्तव्‍यदक्ष असणे किती आवश्‍यक आहे, हे यावरून लक्षात येते ! गोवंश हत्‍याबंदी कायदा राज्‍यात लागू असूनही गोतस्‍करांना त्‍याचा धाक नाही, हेसुद्धा लक्षात येते. गोवंशियांसाठी सुरक्षित वातावरण पोलीस राज्‍यात कधी निर्माण करणार ? – संपादक )