कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील बसस्‍थानक सुशोभिकरणाचा प्रस्‍ताव अंतिम टप्‍प्‍यात

‘एस्.टी. बसस्‍थानक दत्तक योजना’ घोषित केली आहे. या अंतर्गत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २४ बसस्‍थानकांचे सुशोभिकरण करण्‍यात येणार आहे. यांसाठी उद्योजक, व्‍यापारी संस्‍था यांच्‍याकडे सूचना मागवण्‍यात आल्‍या आहेत.

कोयना धरणात २१.५७ टी.एम्.सी. पाणीसाठा !

कोयना धरणामध्‍ये पाण्‍याची आवक वाढली असली, तरी धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्‍या टप्‍प्‍यामध्‍ये निर्माण होणारी वीजनिर्मिती अजूनही बंद ठेवण्‍यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार घोषित !

‘लोकमान्‍य टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’च्‍या वतीने देण्‍यात येणारा ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त डॉ. रोहित टिळक यांनी १० जुलै या दिवशी झालेल्‍या पत्रकार परिषदेत या पुरस्‍काराची घोषणा केली.

कुराण जाळल्‍याच्‍या निषेधार्थ स्‍वीडिश मालावर येमेनकडून बंदी !

हुती विद्रोहींनी वर्ष २०१४ च्‍या शेवटी साऊदी अरेबियासमर्थित सरकारला राजधानी सना येथून हटवून स्‍वत:चे वर्चस्‍व प्रस्‍थापित केले. साधारण ९ वर्षांपासून हुती विद्रोहींचे येमेनच्‍या उत्तर क्षेत्रावर संपूर्ण नियंत्रण आहे.

जुबेर शेखविषयी माहिती गोळा करण्‍यासाठी कराड पोलीस सक्रीय

जुबेर नूर महंमद शेख, असे पोलिसांनी कह्यात घेतलेल्‍या युवकाचे नाव असून तो सातारा जिल्‍ह्यातील कराड शहरातील रहिवासी आहे. गत १० वर्षांपासून तो पुणेे येथे स्‍थायिक असल्‍याची माहिती समजली आहे.

उल्‍हासनगर येथील भाजपाचे नरेश रोहरा यांच्‍या कार्यालयाजवळ गोळीबार

भाजपचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्‍या कार्यालयाजवळ गोळीबार करण्‍यात आला. त्‍यांच्‍या अंगरक्षकांनीही गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्‍हीमध्‍ये चित्रीत झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील उत्तरपत्रिकांच्‍या हस्‍ताक्षर पालट प्रकरणातील आरोपी दीड मासापासून पसार !

हे पोलिसांना लज्‍जास्‍पद आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची माहिती समजल्‍यानंतर त्‍यांना लगेचच का पकडले नाही ? यामुळे आरोपी पसार होण्‍यात पोलिसांचा सहभाग तर नाही ना ? असा विचार कुणाच्‍या मनात आल्‍यास चूक ते काय ?

हिंदु राष्‍ट्र सेनेकडून के. चंद्रशेखर राव यांच्‍या फलकावर शाईफेक करत निषेध !

छत्रपती संभाजीनगर येथे बी.आर्.एस्. पक्षाचा पदाधिकारी मौलाना अब्‍दुल याने लुटारू औरंगजेबाचे उदात्तीकरण करत ‘औरंगजेब आमचा आदर्श आहे’,असे संतापजनक विधान केले आहे.

आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे- उदय सामंत

शालेय शिक्षणाच्या दर्जामध्ये देशातील एकाही राज्याला पहिल्या ५ श्रेणींमध्ये स्थान नाही !

भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्‍वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते !