
कोल्हापूर, १० जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ राज्यातील ५८० बसस्थानकांना स्वच्छ, सुंदर बनवणार आहे. त्यासाठी ‘एस्.टी. बसस्थानक दत्तक योजना’ घोषित केली आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बसस्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यांसाठी उद्योजक, व्यापारी संस्था यांच्याकडे सूचना मागवण्यात आल्या आहेत. या उद्योग संस्थांनी संबंधित बसस्थानके स्वखर्चाने विकसित, देखभाल-दुरुस्ती करावयाची आहेत. या अंतर्गत ३ उद्योजकांचे प्रस्ताव अंतिम टप्पात असून लवकरच कोल्हापूर शहर, जयसिंगपूर आणि चंदगड बसस्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यातील चंदगड बसस्थानक रंगवून पूर्ण होत आले आहे, अशी माहिती राज्य परिवहन मंडळाच्या स्थापत्य विभागातून देण्यात आली.
राज्यशासनाने १ मेपासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ चालू केले आहे. या अंतर्गत दत्तक देण्यात येणारी बसस्थानके स्वच्छ करणे, त्यांची रंगरंगोटी करणे, स्वच्छतागृह स्वच्छ करणे यांसह अन्य गोष्टी करणे महामंडळाला अपेक्षित असून त्याच्या मोबदल्यात संबंधित उद्योजकांनी त्यांच्या उत्पादनांचे विज्ञापन करणे शक्य होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बसस्थाकांचे अंतर्गत रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी २२ कोटी ८० लाख रुपये संमत !
लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांचे अंतर्गत रस्ते सिमेंट-काँक्रीटचे केले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात गारगोटी ७ कोटी रुपये, इचलकरंजी ४ कोटी ३० लाख रुपये, जयसिंगपूर २ कोटी ५० लाख रुपये, नृसिंहवाडी ३ कोटी रुपये, राधानगरी ६ कोटी रुपये, असे २२ कोटी ८० लाख रुपये संमत करण्यात आले आहेत. याचसमवेत जिल्ह्यातील ११ बसस्थानकांपैकी ५ बसस्थानकांमध्ये ‘पेव्हिंग ब्लॉक’ बसवण्याचे काम चालू आहे, तसेच अंतर्गत खड्डेही भरण्याचे काम चालू आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !