कुराण जाळल्‍याच्‍या निषेधार्थ स्‍वीडिश मालावर येमेनकडून बंदी !

सना (येमेन) – युरोपीय देश स्‍वीडनमध्‍ये काही दिवसांपूर्वी इराणी वंशाच्‍या एका शरणार्थीने कुराण जाळल्‍यावरून इस्‍लामी देशांमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे. अशातच येमेनच्‍या उत्तर क्षेत्रावर नियंत्रण मिळवलेल्‍या हुती विद्रोहींनी स्‍वीडनकडून आयात करणार्‍या सर्व वस्‍तूंवर बंदी घातली आहे. अशी बंदी घालणारा येमेन हा पहिला इस्‍लामी देश ठरला आहे. येथील व्‍यापार मंत्र्याने सांगितले की, जर आम्‍ही असा निर्णय घेऊ शकतो, तर सर्व इस्‍लामी देशांनी तो घेतलाच पाहिजे. इस्‍लामी देशांनी असा निर्णय घ्‍यावा, असे मी त्‍यांना आवाहन करतो.

हुती विद्रोहींनी वर्ष २०१४ च्‍या शेवटी साऊदी अरेबियासमर्थित सरकारला राजधानी सना येथून हटवून स्‍वत:चे वर्चस्‍व प्रस्‍थापित केले. साधारण ९ वर्षांपासून हुती विद्रोहींचे येमेनच्‍या उत्तर क्षेत्रावर संपूर्ण नियंत्रण आहे.

संपादकीय भूमिका