जुबेर शेखविषयी माहिती गोळा करण्‍यासाठी कराड पोलीस सक्रीय

इसिसशी संबंधित असल्‍याने अटक

प्रतिकात्मक चित्र

कराड, १० जुलै (वार्ता.) – भारतामध्‍ये बंदी घातलेल्‍या इस्‍लामिक स्‍टेट ऑफ इराक अंँड सीरिया (इसिस) या आतंकवादी संघटनेत तरुणांची भरती करण्‍यासाठी सामाजिक माध्‍यमांतून मतपरिवर्तन करण्‍याचा प्रयत्न करत असलेल्‍या युवकास राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने पुणे येथून अटक केली आहे. जुबेर नूर महंमद शेख, असे पोलिसांनी कह्यात घेतलेल्‍या युवकाचे नाव असून तो सातारा जिल्‍ह्यातील कराड शहरातील रहिवासी आहे. गत १० वर्षांपासून तो पुणेे येथे स्‍थायिक असल्‍याची माहिती समजली आहे. जुबेर शेख याचा कराडमध्‍ये कुणाशी संपर्क आहे का ? यांसह विविध अंगाने पोलीस यंत्रणा अन्‍वेषण करत आहे.