कोयना धरणात २१.५७ टी.एम्.सी. पाणीसाठा !

कोयना धरण (संग्रहित चित्र)

सातारा, १० जुलै (वार्ता.) – कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्‍यात पावसाचा जोर वाढला असून धरण पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गत २४ घंट्यांत धरणातील पाणीसाठ्यात १.६३ टी.एम्.सी.ने, तर पाणी उंचीत ३.१० फूट वाढ झाली आहे. धरणामध्‍ये आता एकूण उपलब्‍ध पाणीसाठा २१.५७ असून त्‍यापैकी उपयुक्‍त पाणीसाठा १६.५७ टी.एम्.सी. आहे. सध्‍या कोयना धरणामध्‍ये प्रतिसेकंद सरासरी १८ सहस्र ९४४ क्‍युसेक्‍स पाण्‍याची आवक होत आहे.

कोयना धरणामध्‍ये पाण्‍याची आवक वाढली असली, तरी धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्‍या टप्‍प्‍यामध्‍ये निर्माण होणारी वीजनिर्मिती अजूनही बंद ठेवण्‍यात आली आहे. धरणातील जलपातळी ६३० मीटरच्‍या वर गेल्‍यानंतर चौथ्‍या टप्‍प्‍यातून वीजनिर्मिती पुन्‍हा चालू करण्‍यात येणार आहे.