आश्रमाच्या भूमीतील पाण्याची स्पंदने शोधण्यासाठी नकाशावरून बोट फिरवणे, तेव्हा ‘तोंडात लाळ सुटलेल्या ठिकाणी भूमीमध्ये पाणी आहे’, असे जाणवणे आणि त्याच ठिकाणी पाणी असल्याचे सिद्ध होणे
‘वाराणसी येथील आश्रमाच्या भूमीमध्ये विहीर खणण्यासाठी ‘तेथील भूमीमध्ये पाणी कुठे आहे ?’, हे शोधायचे होते. त्यासाठी मला त्या जागेचा नकाशा देण्यात आला. मी त्या नकाशावरून माझे बोट फिरवून भूमीमध्ये पाणी असल्यास त्याची स्पंदने बघत होतो.