गोवंशियांना पशूवधगृहाकडे घेऊन जाणारा टेेंपो पोलिसांनी पकडला !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १ जून (वार्ता.) – दाटीवाटीने गोवंशियांना कोंबून त्‍यांना पशूवधगृहाकडे नेणारा टेंपो तळबीड (जिल्‍हा सातारा) पोलिसांनी पकडला. याविषयी महेश चव्‍हाण यांच्‍यावर प्राणी संरक्षण अधिनियम १६६ च्‍या कलम ९ अन्‍वये गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. तासवडे पथकर नाक्‍यावरून कोल्‍हापूरच्‍या दिशेने पशूवधगृहाकडे गोवंशीय घेऊन टेंपो निघाल्‍याची माहिती तळबीड पोलिसांना मिळाली. त्‍यांनी तासवडे पथकर नाक्‍यावर सापळा रचला आणि टेंपो पकडला. त्‍यामध्‍ये त्‍यांना दाटीवाटीने भरलेले ३ बैल, ३ देशी गायी, १ वासरू आणि ३ जर्सी गायी अशी जनावरे आढळून आली. सर्व जनावरे अमानुषपणे दोरखंडाने बांधलेली होती.