अजित पवार यांचा भाजपप्रवेश रोखण्‍यासाठी शरद पवार यांचे त्‍यागपत्र ! – दैनिक सामना

राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपच्‍या उंबरठ्यापर्यंत पोचला आहे. पक्षातील ‘ईडी’सारख्‍या अन्‍वेषण यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्‍वस्‍थता आणि त्‍यातून सहकार्‍यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण शरद पवार यांच्‍या त्‍यागपत्रात आहे काय ?

पुण्‍यात दुकानातील स्‍फोटाचे ए.टी.एस्.कडून अन्‍वेषण !

येथे १ मेच्‍या मध्‍यरात्री सातारा रस्‍त्‍यावरील सहकारनगरमधील ३ इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या दुकानांना भीषण आग लागली. यात काही इलेक्‍ट्रानिक्‍स उपकरणांचे स्‍फोट झाल्‍याने संबंधित इमारतीची पडझड झाली.

छत्रपती संभाजीनगर येथील घरकुल घोटाळ्‍यातील चुकीला क्षमा नाही, कठोर कारवाई करू ! – जी. श्रीकांत, आयुक्‍त, महापालिका

घरकुल घोटाळ्‍याविषयी सर्वप्रथम पूर्ण माहिती घेतली जाईल. मी वर्तमानपत्रात याविषयी वाचले, तेवढेच मला माहिती आहे. या प्रकरणात ज्‍यांनी चुका केल्‍या असतील, त्‍यांना क्षमा केली जाणार नाही.

खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांच्‍या अपघातात चौघे ठार !

विटा-सातारा रस्‍त्‍यावर नेवरी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांचा ४ मे या दिवशी सकाळी ७ वाजता समोरासमोर अपघात होऊन एकाच कुटुंबातील चारजण ठार झाले आहेत.

पुणे येथे ५० सहस्र रुपयांमध्‍ये दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी उघडकीस !

५० सहस्र रुपयांमध्‍ये इयत्ता दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघड केली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सांगली येथे ही टोळी कार्यरत असून पाचवी ते सातवीच्‍या दरम्‍यान अनुतीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना कोणतीही परीक्षा न देता आयतेच दहावीचे बनावट प्रमाणपत्र देण्‍याचा हा अपप्रकार …..

‘लव्‍ह जिहाद’ चे भीषण वास्‍तव उघड करणारा ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट आज प्रदर्शित होणार !

केरळमधील लव्‍ह जिहादचे भीषण वास्‍तव उघड करणारा ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट ५ मे या दिवशी भारतातील सर्व राज्‍यांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावर काहींनी आक्षेप घेतला होता. सर्वोच्‍च न्‍यायालयात या चित्रपटाच्‍या विरोधात याचिकाही प्रविष्‍ट करण्‍यात आली होती.

गोवा येथे शांघाय सहकार्य परिषदेला प्रारंभ

२ दिवसीय परिषदेत अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.

६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्‍पग्रस्‍तांची भेट घेणार ! – उद्धव ठाकरे

प्रकल्‍प करण्‍यापूर्वी स्‍थानिकांपुढे प्रकल्‍पाच्‍या आराखड्याचे सादरीकरण व्‍हायला हवे. बळजोरीने प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात येऊ नये. ६ मे या दिवशी बारसू येथे जाऊन प्रकल्‍पग्रस्‍तांची घेट घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही ! – शरद पवार

जो निर्णय मी घेतला आहे, तो पक्षाच्या भवितव्यासाठी आहे. तरीही यावर पुनर्विचार करून मी दोन दिवसानंतर निर्णय घेईन.

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडणार ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी शासनाकडून प्रयत्न चालू आहेत. या दृष्टीने दुर्गम भागांतील ज्या शाळांमध्ये ‘नेटवर्क’ नाही, अशा शाळांची शिक्षण विभागाकडून माहिती मागवण्यात येत आहे.