खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांच्‍या अपघातात चौघे ठार !

प्रतिकात्मक छायाचित्र

विटा (जिल्‍हा सांगली) – विटा-सातारा रस्‍त्‍यावर नेवरी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांचा ४ मे या दिवशी सकाळी ७ वाजता समोरासमोर अपघात होऊन एकाच कुटुंबातील चारजण ठार झाले आहेत. देवीचे दर्शन घेऊन येत असतांना गाडीचालकाला झोप आल्‍याने अपघात झाला असावा, असे घटनास्‍थळावरील काही नागरिकांनी सांगितले. या प्रकरणी विटा पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला असून ते या घटनेचे अधिक अन्‍वेषण करत आहेत.