पंतप्रधान मोदी यांनी उचललेल्या पावलांमुळे खलिस्तानी चळवळ कमकुवत !

अमेरिकेतील शीख शिष्टमंडळाचे मत

शीख अमेरिकी शिष्टमंडळ आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदायाच्या हितासाठी उचललेल्या पावलांमुळे खलिस्तानी चळवळ कमकुवत झाली, असे विधान शीख अमेरिकी लोकांच्या शिष्टमंडळाने येथे केले. या शिष्टमंडळाने अमेरिकेच्या भेटीवर आलेल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत त्यांनी हे विधान केले.

जसदीप सिंह आणि कंवलजित सिंह सोनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सीतारामन् यांचे स्वागत केले. ‘शीख समुदायाच्या काही मागण्या होत्या; मात्र मोदी यांच्या मागील ९ वर्षांच्या कार्यकाळात या मागण्यांची पूर्तता झाली. अमेरिकेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके खलिस्तानी कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे पूर्ण शीख समुदायाची अपकीर्ती होत आहे’, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.