‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याने त्यांवर बंदी आणा !

चीनने केवळ सीमेवरच भारताला धोका दिला असे नाही, तर त्याने देशातील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधांवरही आक्रमण केले आहे. चिनी बनावटीच्या ‘सीसीटीव्ही’ कॅमर्‍यांवर बंदी आणली पाहिजे.

खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांचे उद्गार !

उद्धव ठाकरे यांनी आमचा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. त्याच मैदानात सभा आम्ही १९ मार्चला घेणार असून या सभेला व्याजासहित उत्तर देऊ.

काश्मिरात ३४ वर्षांनंतर २०० चित्रपटांचे चित्रीकरण !

भारत शासन काश्मिरी जनतेवर अत्याचार करत असल्याची आवई उठवणार्‍या ‘बीबीसी’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसारख्या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना आता या घटनेवरून जाब विचारणे आवश्यक !

वडगाव हवेली (तालुका कराड) येथील ग्रामपंचायतच्या २ कोटी रकमेच्या पाईप आगीच्या भक्षस्थानी !

कराड येथील वडगाव हवेली गावासाठी महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन अंतर्गत २४ घंटे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी रकमेच्या पाईप आणून ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवार, ३ मार्च या दिवशी रात्री या पाईप आगीच्या भक्षस्थानी पडल्या. ग्रामपंचायतच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

देहू (पुणे) येथे संत श्री तुकाराम महाराज बीजेची जोरात सिद्धता !

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा ९ मार्च या दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पूर्ण सिद्धता करण्यात येत आहे. भाविकांकरिता आरोग्य, निवारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय संस्थानने केली आहे.

बंडखोरीमुळे लोकशाही जिवंत रहाणार कि नाही ?, असा प्रश्‍न उभा राहिला ! – भास्कर जाधव

आताचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत सगळीकडे ही कामे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात झाली आहेत, असे खोटेच सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांसाठी एकही पैसा दिलेला नाही.

संत श्री बाळूमामा यांच्या पालखीचे जलमंदिर पॅलेस येथे भव्य स्वागत !

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील प्रसिद्ध संत श्री बाळूमामा यांची पालखी २ दिवसांपासून शहरातील मंगळवार पेठेतील माळावर वास्तव्यास आहे. पालखीचे सातारा शहरातून प्रस्थान होतांना जलमंदिर पॅलेस येथे भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.

शिवसेना नाव चोरले; मात्र पक्ष चोरू शकत नाही ! – उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानात सार्वजनिक सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधाचा निषेध करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘नगर बंद’ची हाक !

येथील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमणकर्त्यांना अद्याप अटक झाली नाही. या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ मार्च या दिवशी ‘नगर बंद’ची हाक देण्यात आली आहे.

भक्तीभाव नसलेल्यांकडे मंदिरांचे उत्तरदायित्व देणे, हा धर्मद्रोह !

मंदिराचे व्यवस्थापन सांभाळायला भक्तीभाव नसलेल्यांकडे सरकार मंदिरांचे उत्तरदायित्व देते. त्यामुळे मंदिरांत भ्रष्टाचार होतो आणि मंदिरांची सात्त्विकताही नष्ट होत आली आहे ! हिंदु राष्ट्रात चांगल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले