संत श्री बाळूमामा यांच्या पालखीचे जलमंदिर पॅलेस येथे भव्य स्वागत !

सातारा, ६ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील प्रसिद्ध संत श्री बाळूमामा यांची पालखी २ दिवसांपासून शहरातील मंगळवार पेठेतील माळावर वास्तव्यास आहे. पालखीचे सातारा शहरातून प्रस्थान होतांना जलमंदिर पॅलेस येथे भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.

लक्ष्य मराठी न्यूज 

संत श्री बाळूमामा यांची पालखी आणि मेंढरे संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतात. गुढीपाडव्याला या पालखी सोहळ्याची सांगता श्रीक्षेत्र आदमापूर येथे होते. सातारा येथील २ दिवसांचे वास्तव्य संपवून पालखी आंबेदरेच्या दिशेने निघाली. तेव्हा जलमंदिर पॅलेस येथे खासदार भोसले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. खासदार भोसले यांच्या हस्ते संत श्री बाळूमामा यांच्या चरणी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सहस्रो भाविकांनी श्री बाळूमामा यांच्या पालखीचे दर्शन घेतले.