हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधाचा निषेध करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘नगर बंद’ची हाक !

नगर – हिंदूंवर सातत्याने होणारे आक्रमण, त्याविरोधात हिंदूंनी दिलेल्या संवैधानिक लढ्याला स्थानिक शासन प्रशासनाचा कानाडोळा यांमुळे जिल्ह्यातील हिंदूंमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. अशातच येथील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमणकर्त्यांना अद्याप अटक झाली नाही. या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ मार्च या दिवशी ‘नगर बंद’ची हाक देण्यात आली आहे.