संयमी स्‍वभावाचा आणि शाळेतील सर्वांचा आवडता विद्यार्थी असलेला ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. ऋषिकेश हेमराज पाटील (वय १३ वर्षे) !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. ऋषिकेश हेमराज पाटील या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०१७ मध्‍ये कु. ऋषिकेश पाटील याची आध्‍यात्मिक पातळी ५१ टक्‍के होती आणि आता वर्ष २०२३ मध्‍येही त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५१ टक्‍के आहे.’- संकलक)

कु. ऋषिकेश पाटील

१. घरकामांत साहाय्‍य करणे

‘कु. ऋषिकेश घरातील प्रत्‍येक काम मन लावून करतो. तो इतरांनाही घरकामांत साहाय्‍य करतो. तो त्‍याच्‍या आईला स्‍वयंपाकात साहाय्‍य करतो. घर झाडणे, पुसणे ही कामेही तो सहजपणे करतो.

२. शांत स्‍वभाव

एक महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत ऋषिकेशला रडतांना मी कधी पाहिले नाही. काही शारीरिक दुखणे असल्‍यास लहान मुले पुष्‍कळ रडतात; पण ऋषिकेशने रडून खूप त्रास दिल्‍याचे मला आठवत नाही.

श्री. हेमराज पाटील

३. स्‍वावलंबी असणे

ऋषिकेश स्‍वतःच आपले जेवण वाढून घेतो. तो शाळेचा अभ्‍यास आणि स्‍वतःचे नियोजनही स्‍वत: करतो.

४. कुशाग्र बुद्धीमत्ता

शाळेत जाण्‍यापूर्वीच ऋषिकेश शाळेतील बर्‍याच गोष्‍टी शिकला होता. शाळेतील अभ्‍यासक्रमात असलेल्‍या आणि परीक्षेतील कठीण गोष्‍टीही तो सहजपणे करतो.

५. शाळेतील शिक्षकांशी आदराने वागणे आणि सर्वांचा आवडता विद्यार्थी असणे

शाळेतील कुठल्‍याही कार्यक्रमात ऋषिकेश आवर्जून सहभागी होतो. तो स्‍वतःहून पुढाकार घेऊन मित्रांसह संघटितपणे कोणतीही गोष्‍ट करतो. याबद्दल शिक्षक कौतुक करतात. ऋषिकेश शिक्षकांशी आदरयुक्‍त बोलतोे. शाळेतील शिक्षकांपासून मुख्‍याध्‍यापकांपर्यंत तो सर्वांचा आवडता विद्यार्थी आहे.

६. कोरोनाच्‍या काळात उद़्‍भवलेली परिस्‍थिती शांत आणि संयमाने स्‍वीकारणे

कोरोनाच्‍या काळात दळणवळण बंदी असतांना ऋषिकेशने ती परिस्‍थिती सहज स्‍वीकारली. त्‍याने बाहेर खेळायला जाण्‍यासाठी कधी हट्ट केला नाही. घरातील आम्‍हा सर्वांना कोरोना झाला होता. त्‍या वेळी तो औषधोपचार आणि नामजपादी उपाय पूर्ण करण्‍यासाठी आम्‍हाला आठवण करून देत असे. त्‍या काळात मानसिकदृष्‍ट्या खचून न जाता त्‍याने सक्षमपणे नामजपादी उपाय केले आणि घरातील कामांचेही दायित्‍व घेऊन सर्वांना साहाय्‍य केले. त्‍या वेळी ‘ऋषिकेश शांत आणि संयमी आहे’, असे माझ्‍या लक्षात आले.

७. सदैव सावध असणे

रात्री झोपेतही ऋषिकेशला काही विचारणा केली, तर तो लगेच उठून उत्तरे देतो. त्‍या वेळेला ‘झोपेतही तो अखंड सावध असतो’, असे मला वाटते.

८. ऋषिकेशमुळे त्‍याच्‍या आई-वडिलांचे भांडण न लांबणे

ऋषिकेशच्‍या संदर्भात जाणवलेली एक महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे आम्‍हा पती-पत्नीमध्‍ये काही घरगुती कारणावरून भांडण झाले आणि तेथे ऋषिकेश आला, तर आम्‍हा पती-पत्नीच्‍या मनात ‘आता भांडण करायला नको’, असा विचार एकाच वेळी येतो. त्‍यामुळे आमची भांडणे कधी लांबत नाहीत.

९. धर्माचरणी आणि स्‍तोत्रपठण करणे

ऋषिकेश नेहमी कपाळाला टिळा लावतो. तो जेवतांना प्रार्थना करतो आणि झोपण्‍यापूर्वी प्रार्थना करूनच झोपतो. तो रामरक्षा आणि मारुतिस्‍तोत्र म्‍हणतो.

१०. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव

ऋषिकेश गुरुमाऊलींना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रतिदिन साष्‍टांग दंडवत घालतो.

११. स्‍वभावदोष

हट्टीपणा आणि गांभीर्याचा अभाव असणे.’

– श्री. हेमराज भगवान पाटील (कु. ऋषिकेशचे वडील), जळगाव (८.५.२०२२)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.