‘ऑनलाईन’ सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे कृती करून अनुभूती घेणार्‍या भरूच (गुजरात) येथील सौ. नीता गायकवाड !

‘सनातन संस्‍थेच्‍या एका ‘ऑनलाईन’ सत्‍संगात मी सहभागी होत आहे. या सत्‍संगातून मला चांगली माहिती मिळाली. सत्‍संगात सांगितलेल्‍या माहितीनुसार मी केलेले प्रयत्न आणि मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

१. रिकाम्‍या खोक्‍यांचे उपाय केल्‍यावर मुलाचा ताप न्‍यून होऊन त्‍याच्‍या प्रकृतीत सुधारणा होणे

माझ्‍या मुलाला ताप आला होता. त्‍याचा ताप उतरत नव्‍हता. वैद्यकीय उपचारही चालू होते. सनातन संस्‍थेच्‍या ‘ऑनलाईन’ सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे मी मुलाला नामजप करायला सांगितला. ४ दिवस मी त्‍याच्‍यावर रिकाम्‍या खोक्‍यांचे उपाय केले. परिणामी मुलाचा ताप उतरला आणि त्‍याच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली.

२. रिकाम्‍या खोक्‍यांचे उपाय केल्‍याने हलकेपणा अनुभवणे

मी स्‍वतः रिकाम्‍या खोक्‍यांचे उपाय करते. त्‍या वेळी मला आकाशतत्त्व अनुभवता आले. खोक्‍यांच्‍या उपायांमुळे मला चांगले आणि हलके वाटते.

३. सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकवाच्‍या कार्यक्रमाच्‍या वेळी केलेले प्रयत्न !

मी हळदी-कुंकवाला आलेल्‍या सर्व महिलांना सनातन संस्‍थेच्‍या कार्याबद्दल माहिती सांगितली. मी त्‍यांना सात्त्विक वाण आणि मकरसंक्रांत यांची माहिती अन् महत्त्व सांगितले, तसेच ‘यू ट्यूब’वरील सनातन संस्‍थेचे सत्‍संग ऐकायला सांगितले. मी सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे हळदी-कुंकवाला आलेल्‍या महिलांना सात्त्विक वाण म्‍हणून सनातन संस्‍थेचे लघुग्रंथ, उदबत्ती, कुंकू, अशी सात्त्विक उत्‍पादने दिली.

मी सांगितलेली माहिती हळदी-कुंकवासाठी आलेल्‍या सर्व महिलांना पुष्‍कळ आवडली. त्‍यांनी दिलेले अभिप्राय पुष्‍कळ चांगले होते; तसेच त्‍यांनी ‘लघुग्रंथांमधून नवीन माहिती मिळाली’, असे सांगितले. माझ्‍याकडून झालेले प्रयत्न मी ईश्‍वरचरणी समर्पित करते.’

– सौ. नीता युवराज गायकवाड, भरूच, गुजरात. (२१.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक