पाडव्‍याच्‍या दिवशी वर्षफल ऐकण्‍याचा लाभ !

वर्षाच्‍या आरंभी त्‍या वर्षात घडणार्‍या बर्‍या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्‍यास त्‍याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्‍यवस्‍था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्‍याचा खरा लाभ असतो.

गेल्‍या वर्षभरात सनातनचे विविध भाषांत ३४ नवीन ग्रंथ प्रसिद्ध आणि २५४ ग्रंथ-लघुग्रंथ यांचे पुनर्मुद्रण !

अखिल मानवजातीच्‍या उद्धारार्थ हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेची गुढी उभारण्‍यासाठी अहर्निष कार्यरत असणारी महान विभूती म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! ‘हिंदु राष्‍ट्र’ हे धर्माच्‍या अधिष्‍ठानावरच उभे रहाणार असल्‍याने हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्‍यक आहे.

हिंदु संस्‍कृतीला वर्धिष्‍णू करणारा गुढीपाडवा !

गुढीपाडवा, म्‍हणजेच चैत्र शुक्‍ल प्रतिपदेच्‍या दिवशी शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचेे आगमन झालेले असते आणि ही संपूर्ण चराचर सृष्‍टी सृजनाच्‍या गंधाने रंगून गेलेली असते. कुठे शुभ्र मोगर्‍याला बहर आलेला असतो, तर कुठे आम्रवृक्षाच्‍या मोहराचा सुगंध दरवळत असतो. वृक्ष, वनस्‍पती चैत्र पालवीने फुलत असतात.

परिपूर्ण भारतीय कालमापन पद्धत !

हिंदु कालमापन पद्धतीचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळकृष्‍ण आणि रामकृष्‍ण संगमेश्‍वरकर या बंधूंकडून ‘करण कौस्‍तुभ’ हा ग्रंथ सिद्ध करवून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्‍याकरवी ‘समयनय:’ हा असाच हिंदुु कालमापन शास्‍त्रावर आधारित ग्रंथ लिहून घेतलेला आहे.

गुढीची झुकलेली स्‍थिती

गुढी थोडीशी झुकलेल्‍या स्‍थितीत ठेवल्‍याने तिची रजोगुणी ईश्‍वरी चैतन्‍याच्‍या लहरी प्रक्षेपण करण्‍याची क्षमता वाढल्‍याने जिवांना वातावरणातील चैतन्‍याचा लाभ दीर्घकाळ मिळण्‍यास साहाय्‍य होते.

हिंदुकरणासाठी अनुकूल काळ !

काही वर्षांपूर्वी हिंदु धर्म, संस्‍कृती, सभ्‍यता, स्‍त्रिया यांच्‍या रक्षणासाठी हिंदूंना साद घातल्‍यास काही जागृत हिंदूंचा अपवाद वगळता कुणी त्‍याकडे वळायचेच नाही. हिंदूंना त्‍यांच्‍यावरील अन्‍यायाची जाणीव करून दिल्‍यावरही हिंदु जनसमुहातील काही मोजकेच हिंदू पुढे यायचे.

साधिकेच्‍या वाढदिवसानिमित्त तिच्‍या सुनेने रांगोळीने काढलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सुबक चित्र !

वाढदिवसाच्‍या दिवशी मला कसलीच भेट नको होती; कारण ‘आपत्‍काळ असल्‍याने उगीच खर्च नको’, असे मला वाटत होते. सुनेने ही रांगोळी काढल्‍यावर मला जे पाहिजे, ते मिळाले; म्‍हणून माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा !

‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया !’

साधकांनो, नूतन शोभन संवत्‍सरात सनातनच्‍या गुरुपरंपरेप्रती ‘समर्पणभाव’ आणि ‘शरणागतभाव’ वाढवण्‍यासाठी प्रयत्न करा !

‘२२.३.२०२३ या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्‍हणजे ब्रह्मांडनिर्मितीचा दिवस ! ऋषींनी ‘कल्‍प, मन्‍वंतर, युग, संवत्‍सर, ऋतू, मास, पक्ष, वार, तिथी, मुहूर्त, घटिका, विघटी, परमाणू’, अशी ब्रह्मांडाची कालगणना सांगितली आहे. गुढीपाडव्‍याला ‘शुभकृत्’ संवत्‍सर पूर्ण होऊन ‘शोभन’ संवत्‍सराला आरंभ होणार आहे.