‘ही जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या शरणागत भावामुळे कार्यरत झालेल्या सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहे. शरणागत स्थितीत कार्यरत झालेली सुषुम्ना नाडी ही जिवाच्या जीवात्मा-शिव दशेचे द्योतक आहे. गुढी थोडीशी झुकलेल्या स्थितीत ठेवल्याने तिची रजोगुणी ईश्वरी चैतन्याच्या लहरी प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढल्याने जिवांना वातावरणातील चैतन्याचा लाभ दीर्घकाळ मिळण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून १६.३.२००५)