गेल्‍या वर्षभरात सनातनचे विविध भाषांत ३४ नवीन ग्रंथ प्रसिद्ध आणि २५४ ग्रंथ-लघुग्रंथ यांचे पुनर्मुद्रण !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या अव्‍यक्‍त संकल्‍पाची फलश्रुती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अखिल मानवजातीच्‍या उद्धारार्थ हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेची गुढी उभारण्‍यासाठी अहर्निष कार्यरत असणारी महान विभूती म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! ‘हिंदु राष्‍ट्र’ हे धर्माच्‍या अधिष्‍ठानावरच उभे रहाणार असल्‍याने हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्‍यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्‍यामध्‍ये ज्ञानशक्‍ती, इच्‍छाशक्‍ती आणि क्रियाशक्‍ती यांपैकी ज्ञानशक्‍तीचे योगदान सर्वाधिक आहे. ज्ञानशक्‍तीच्‍या माध्‍यमातून कार्य होण्‍याचे सर्वांत प्रभावी माध्‍यम म्‍हणजे ‘ग्रंथ’ !

‘हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी घोर आपत्‍काळाला आरंभ होण्‍यापूर्वीच ‘ग्रंथांच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक धर्मप्रसार करणे’, ही सध्‍याच्‍या काळातील श्रेष्‍ठ साधना आहे !’, हे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचे उद़्‍गार आहेत. अशा प्रकारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य गतीने होण्‍यासाठी एकप्रकारे अव्‍यक्‍त संकल्‍पच झालेला आहे. या संकल्‍पाचीच फलश्रुती म्‍हणून गेल्‍या काही वर्षांत सनातनचे ग्रंथकार्य अनेक पटींनी वाढले आहे.

१. मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत विविध भाषांत मिळून ३४ नवीन ग्रंथ प्रसिद्ध !

२. मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत विविध भाषांत मिळून २५४ ग्रंथ-लघुग्रंथ यांचे पुनर्मुद्रण !

३. ‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’ला लाभलेला वाचकांचा उदंड प्रतिसाद !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांच्‍या अव्‍यक्‍त संकल्‍पामुळे सप्‍टेंबर २०२१ पासून सनातन संस्‍थेचा राष्‍ट्रव्‍यापी ‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियान’ हा उपक्रम आरंभ झाला. या अभियानाच्‍या माध्‍यमातून समाजातील प्रत्‍येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसादही लाभत आहे. या अभियानाच्‍या अंतर्गत अवघ्‍या ६ मासांतच मराठी, हिंदी, कन्‍नड, गुजराती आणि इंग्रजी या ५ भाषांतील ३,२७,३६३  ग्रंथांची विक्री झाली आहे ! ‘कोरोना’सारख्‍या महामारीच्‍या काळात अनेकांचा एकटेपणा, नैराश्‍य इत्‍यादी घालवून त्‍यांना साधनामार्गाकडे वळवण्‍यात या ग्रंथांचा मोठा हातभार लागला.

४. गेल्‍या वर्षभरात विविध भाषांत मिळून ४ लक्षांहून अधिक ग्रंथ-लघुग्रंथांची विक्री !

पू. संदीप आळशी

ग्रंथप्रदर्शने आणि विक्रीकेंद्रे, ‘ऑनलाईन’ ग्रंथविक्री आदी माध्‍यमांद्वारे सनातनचे ग्रंथ समाजात पोचत आहेत. वर्ष २०२२-२३ या वर्षात विविध भाषांत मिळून ४ लक्ष १४ सहस्र २९१ ग्रंथ-लघुग्रंथांची विक्री झाली आहे. केवळ एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्‍या ग्रंथविक्रीवरून समाजात सनातनच्‍या ग्रंथांना लोकप्रियता मिळत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

५. इ-बुक : आधुनिक पिढीतील वाचकांसाठी सनातनचे ग्रंथ ‘इ-बुक’ स्‍वरूपातही उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहेत. फेब्रुवारी २०२३ पर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील ९ ग्रंथ उपलब्‍ध करण्‍यात आले असून लवकरच अन्‍य ग्रंथही उपलब्‍ध करण्‍यात येणार आहेत.

६. सनातनच्‍या ग्रंथांचे विदेशातील हिंदू आणि अहिंदू यांना लक्षात आलेले महत्त्व !

६ अ. इंग्‍लंड, ऑस्‍ट्रेलिया, अमेरिका, पाकिस्‍तान, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, नेपाळ इत्‍यादी देशांतूनही ‘इ-मेल’द्वारे सनातनच्‍या ग्रंथांना मागणी येत आहे.

६ आ. विदेशातील काही संकेतस्‍थळांनी सनातनच्‍या ग्रंथांची पाने विदेशी भाषांत भाषांतरित करून ठेवली आहेत. या पानांना प्रतिमास १ लक्षाहून अधिक जिज्ञासू भेट देतात. विविध संकेतस्‍थळे सनातनच्‍या ग्रंथांत दिलेले आध्‍यात्मिक उपाय, विनाऔषधी उपचारपद्धती इत्‍यादी माहिती समाजहितासाठी प्रसिद्ध करतात.

६ इ. सनातनचे ग्रंथ पाहून न्‍यूयॉर्क, अमेरिका येथील श्री. दीपक घोष म्‍हणाले, ‘‘सनातन-निर्मित ग्रंथांतील ज्ञानाद्वारे जगभर सनातन हिंदु धर्माचा सुगंध पसरवण्‍याचे आपले प्रयत्न स्‍तुत्‍य असून त्‍याबद्दल आपले अभिनंदन !’’

७. शीघ्र आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी ग्रंथकार्यात सहभागी व्‍हा !

ज्ञानशक्‍ती, इच्‍छाशक्‍ती आणि क्रियाशक्‍ती यांपैकी ज्ञानशक्‍तीच्‍या स्‍तराची सेवा केल्‍यामुळे आध्‍यात्मिक उन्‍नती सर्वाधिक शीघ्रतेने होऊ शकते. यासाठीच ग्रंथसेवेचे महत्त्व अनन्‍यसाधारण आहे.

वर्ष १९९५ पासून फेब्रुवारी २०२३ पर्यंत ३६० ग्रंथ-लघुग्रंथ यांच्‍या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्‍नड, तमिळ, तेलुगु, मल्‍ल्‍याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्‍पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ९२ लाख ८१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्‍या आहेत. अन्‍य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंंथांच्‍या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्‍यासाठी अनेकांच्‍या साहाय्‍याची आवश्‍यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्‍या सेवेत आपण सहभागी होऊ शकता. यासह ग्रंथांचा प्रसार करणे, ग्रंथांसाठी अर्पण किंवा विज्ञापने (जाहिराती) देणे किंवा मिळवणे, ग्रंथांचे वितरण करणे आदी सेवांमध्‍येही आपण सहभागी होऊ शकता. ‘सर्वांनीच या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्‍यावा !’, ही नम्र विनंती !’

– पू. संदीप आळशी, सनातनच्‍या ग्रंथांचे संकलक (५.३.२०२३)


सण साजरे करण्‍याच्‍या योग्‍य पद्धती आणि शास्‍त्र

हिंदु धर्मातील सण, उत्‍सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्‍त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !

सनातनच्‍या या ग्रंथात वाचा…

  • सण धर्मशास्‍त्रानुसारच का साजरे करावेत ?
  • वर्षाऋतूत सणवार अधिक प्रमाणात का असतात ?
  • गुढीपाडवा हाच वर्षारंभ का आहे ?
  • गुढीपाडवा सण साजरा कसा करतात ?
  • गुढीपाडव्‍याला कडुनिंबाचा प्रसाद का खावा ?
  • दसरा, दीपावली, मकरसंक्रांत आदी सणांचे महत्त्व काय ?

सनातनच्‍या ग्रंथांच्‍या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७