साधिकेच्‍या वाढदिवसानिमित्त तिच्‍या सुनेने रांगोळीने काढलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सुबक चित्र !

रांगोळीने काढलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चित्र

 

श्रीमती सुनीता आधाने

१. साधिकेच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने तिच्‍या सुनेने श्रीकृष्‍ण रूपातील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची रांगोळी काढणे आणि ती रांगोळी पाहून साधिकेची भावजागृती होणे अन् तिच्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त होणे : ‘९.६.२०२१ या दिवशी माझ्‍या वाढदिवसानिमित्त माझ्‍या सुनेने (सौ. प्रिया आधाने, वय २५ वर्षे) परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या श्रीकृष्‍ण रूपाची रांगोळी काढली. आरंभी माझ्‍या मुलाने माझे डोळे बंद केले. तेव्‍हा माझे गुरुस्‍मरण चालू झाले. मला डोळ्‍यांसमोर गुरुदेव दिसत होते. मी डोळे उघडल्‍यावर सुंदर रंगीत रांगोळीतील स्‍मितहास्‍य करणारे गुरुदेव पाहून मला फार आनंद झाला आणि माझा भाव जागृत झाला. वाढदिवसाच्‍या दिवशी मला कसलीच भेट नको होती; कारण ‘आपत्‍काळ असल्‍याने उगीच खर्च नको’, असे मला वाटत होते. सुनेने ही रांगोळी काढल्‍यावर मला जे पाहिजे, ते मिळाले; म्‍हणून माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त झाली आणि मी सुनेचे आभार मानले.

 

 

सौ. प्रिया आधाने

२. सुनेने श्रीकृष्‍ण रूपातील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र संकेतस्‍थळावरून मिळवणे आणि तिनेे पुष्‍कळ प्रार्थना केल्‍यावर तिच्‍याकडून रांगोळी काढून पूर्ण होणे : मी सुनेला विचारले, ‘‘माझ्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी ही रांगोळी काढायचे कुणाला सुचले ?’’ तेव्‍हा ती म्‍हणाली, ‘‘मीच ठरवले. ‘तुम्‍हाला गुरुदेवांची रांगोळी बघून आनंद होईल’, असे मला वाटले.’’ सुनेने संकेतस्‍थळावरून छायाचित्र मिळवले. तिने गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, मला ही रांगोळी काढण्‍यात साहाय्‍य करा. ही रांगोळी पाहून आईंना (सासूबाईंना) आनंद होईल.’ तिला रांगोळी काढतांना त्‍यात गुरुदेवांचे डोळे आणि त्‍यांच्‍या मुखावरील भाव रेखाटायला जमत नव्‍हते. तिने पुष्‍कळ प्रार्थना केल्‍यानंतर तिला ते जमले.

 

३. मुलाचे लग्‍न झाल्‍यापासून मी सुनेला गुरुदेव आणि आश्रम यांच्‍याविषयी अनुभूती सांगत असते. तेव्‍हा तिचाही भाव जागृत होतो. तिला आश्रम बघायचा आहे आणि सेवा करायची आहे. तिला गुरुदेवांना भेटायचे आहे.’

– श्रीमती सुनीता आधाने, संभाजीनगर (९.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक