परिपूर्ण भारतीय कालमापन पद्धत !

दाते पंचांग

१. हिंदु कालमापन पद्धतीवरील ग्रंथ !

हिंदु कालमापन पद्धतीचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळकृष्‍ण आणि रामकृष्‍ण संगमेश्‍वरकर या बंधूंकडून ‘करण कौस्‍तुभ’ हा ग्रंथ सिद्ध करवून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्‍याकरवी ‘समयनय:’ हा असाच हिंदुु कालमापन शास्‍त्रावर आधारित ग्रंथ लिहून घेतलेला आहे. हा ग्रंथ तिथीनिर्णय या विषयावर लिहिला गेला आहे.

२. प्रत्‍येक ३ वर्षांनी येणार्‍या ‘अधिक मासा’मुळे परिपूर्ण झालेली हिंदु कालमापन पद्धत !

भारतीय म्‍हणजे हिंदु कालमापन पद्धतीमध्‍ये वर्षाचे १२ मास आणि प्रत्‍येक मासाच्‍या १५ दिवसांचे दोन पंधरवडे असतात. यात चंद्र आणि सूर्य या दोहोंच्‍या गतींचा विचार करण्‍यात आलेला आहे. चंद्राला पृथ्‍वीभोवती १२ फेर्‍या पूर्ण करण्‍यासाठी लागणारा वेळ हा पृथ्‍वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्‍यासाठी लागणार्‍या वेळेपेक्षा सुमारे ५० मिनिटे न्‍यून असतो. हा काळ साचून ३ वर्षांत एका संपूर्ण मासाचा काळ सिद्ध होतो. म्‍हणून प्रत्‍येक ३ वर्षांनी आपल्‍या हिंदु पंचांगात ‘अधिक मास’ येतो. या अधिक मासाच्‍या संकल्‍पनेमुळे हिंदु कालमापनपद्धत अधिक अचूक बनली आहे. अधिक मासाच्‍या योजनेमुळे हिंदूंचे सर्व सण, वार, उत्‍सव त्‍या त्‍या ऋतूंत येतात.

आजही ‘ईद’चा चंद्र कधी उगवणार, हे जाणून घेण्‍यासाठी ‘हिजरी कॅलेंडर’चा (इस्‍लामी दिनदर्शिका) नाही, तर हिंदु कालमापन पद्धतीचाच आधार घेतला जातो. दाते पंचांग पाहून ईदचा चंद्र केव्‍हा दिसणार ? ते ठरवले जाते. अमेरिकेने राबवलेल्‍या अंतराळ मोहिमांपैकी अनेक मोहिमा या त्‍या दिवशी त्‍यांच्‍या भूभागात एकादशी या तिथीच्‍या दिवशी राबवल्‍या गेल्‍याचे लक्षात आले. या तिथीला यानाला अवकाश भेदण्‍यास अनुकूल अशी स्‍थिती असते, असे लक्षात आले.

(‘संकेतस्‍थळा’वरून साभार)

२०२३ या वर्षाच्‍या गुढीपाडव्‍याला हिंदु धर्माच्‍या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्‍ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२५ व्‍या वर्षाचा आरंभ होत आहे.

टीप : १ खर्व म्‍हणजे १०,००,००,००,००० वर्षे (शंभर सहस्र लक्ष किंवा लक्ष लक्ष वर्षे), तर १ निखर्व म्‍हणजे १,००,००,००,००,००० वर्षे (दहा सहस्र कोटी वर्षे)