लोकांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी कारवायांत ओढणार्‍यांपासून ब्रिटनला धोका !

ब्रिटनमध्ये वाढणारा खलिस्तानी आतंकवादही ब्रिटीश साम्राज्यासाठी मोठा धोका आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

भ्रमणभाष संच भारित करण्यास लावून बोलत असतांना झालेल्या स्फोटात वृद्धाचा मृत्यू

उज्जैन येथील बडनगरमध्ये भ्रमणभाष संच भारित करण्यासाठी लावून त्यावरून बोलत असतांना त्याचा स्फोट झाला. यात ६८ वर्षीय दयाराम बारोड या वृद्धाचा मृत्यू झाला.

काश्मिरी हिंदूची हत्या करणारा आतंकवादी चकमकीत ठार !

काश्मिरी हिंदूंची हत्या होणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

पुरी जगन्नाथ मंदिरात बलपूर्वक घुसल्या अहिंदु महसूल अधिकारी रेश्मा लखानी !

अहिंदूंना प्रवेश नसणार्‍या मंदिरात बलपूर्वक घुसणार्‍या अशा अधिकार्‍यांना नोकरीवरून काढून टाकले पाहिजे ! हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षाही झाली पाहिजे !

राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनि:स्सारण प्रक्रिया चालू करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नाल्याचे पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम, तसेच अन्य उद्योगांसाठी करावे, असा आदेश औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आला आहे. पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ‘भविष्यात नद्यांचे प्रदूषण अल्प होईल.’

भिडेवाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी न्यायालयात मागणी करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा येथे स्मारक करण्याविषयी तेथील जागेचे मालक, विकासक आणि भाडेकरू यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. न्यायालयीन दाव्यांमुळे या जागेचे भूसंपादन प्रलंबित असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ !

मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले.

गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालून विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

कांदा, लसूण, कापूस यांना भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालत विरोधकांनी सरकारचा धिक्कार केला.

समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे मराठीत द्यावीत ! – आमदार अजय चौधरी

मराठी भाषाभवनाचे भूमीपूजन होऊनही अद्याप कामाला प्रारंभ झालेले नाही. समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे हिंदी आणि इंग्रजी यांमध्ये आहेत.

‘नाईट पार्ट्यां’मुळे अश्वे समुद्रकिनार्‍यावरील कासवांचे अस्तित्व धोक्यात !

‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्‍यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्‍या विपरित परिणामांविषयी गप्प का ?